NCB seizes 20 kg of MD drug Mumbai 1 crore cash 186 kg of gold three people from syndicate including woman were arrested sakal
मुंबई

Mumbai Crime : एनसीबी कडून मुंबईत 20 किलो एमडी जप्त; 1कोटी रोकड, 186 किलो सोने ताब्यात...महिलेसह सिंडीकेटमधील तिघे अटकेत

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने डोंगरी परिसरात केलेल्या कारवाईत 20 किलो मेफेड्रोन उर्फ एमडी जप्त

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने डोंगरी परिसरात केलेल्या कारवाईत 20 किलो मेफेड्रोन उर्फ एमडी जप्त केले. याप्रकरणी महिला तस्करासह तिघांना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत 50 कोटी रुपये असून, या छाप्यात 1 कोटी 20 लाख रुपयांची रोख रक्कम व 186 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

गोपनीय माहिती

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात मेफेड्रोनचे वितरण करणारी टोळी कार्यरत असून ती मुंबई व परिसरात त्याचे वितरण करीत असल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई एनसीबीचा पथकाने डोंगरी परिसरात पाळत ठेवली. गोपनीय खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे एन. खान ही व्यक्ती अंमलीपदार्थांच्या वितरणात सक्रिय असून लवकरच मेफेड्रोनचा मोठा साठा येणार असल्याचे अधिकाऱ्यांना समजले.

एनसीबीची कारवाई

एनसीबीच्या पथकाने शुक्रवारी एन. खान याच्या डोंगरीमधील मुक्कामाच्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्याचा साथीदार ए. अली परिसरातच उपस्थित असल्याचे लक्षात आले. थोड्याच वेळात त्यांच्याकडे अवैध अंमलीपदार्थ असल्याचे समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 3 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले.

एन. खानच्या घराची झडती घेतल्यानंतर आणखी दोन किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. एन. खानची चौकशी केली असता डोंगरीमधील ए. एफ. शेख नावाच्या महिलेचा यात सहभाग असल्याचे उघडकीस आले. तिनेच अंमलीपदार्थांचा साठा खानला पुरवल्याचे निष्पन्न झाले.

अमली पदार्थ,कोट्यवधीची रोख रक्कम जप्त

एनसीबीच्या पथकाने तात्काळ संबंधित महिलेच्या घरी छापा टाकला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिच्या घरात 15 किलो मेफेड्रोन सापडले. त्याचबरोबर शोध मोहिमेत तिच्या घराच्या आवारात लपवून ठेवलेले 1 कोटी 10 लाख 24 हजार रुपये रोख व 186.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडले.

चौकशी केली असता सुरुवातीला आरोपी महिलेने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण कसून चौकशी करताच रोख रक्कम अंमलीपदार्थांच्या विक्रीतून मिळाल्याचे आणि काही रकमेतून दागिने खरेदी केल्याचे तिने कबुल केले. तिच्याकडे काही संशयित कागदपत्रे सापडली असून, तीही जप्त करण्यात आली.

आरोपी सराईत तस्कर

अटक करण्यात आलेले तीनही आरोपी गेल्या 7 ते 10 वर्षांपासून अंमलीपदार्थांच्या तस्करीत सक्रिय असल्याचे आरोपींच्या चौकशीत उघड झाले. महिला आरोपी शेखचे जाळे अनेक शहरांमध्ये पसरले असून ती कोट्यवधी रुपयांच्या अंमलीपदार्थांची नियमीत विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले.

तस्करी व त्यातील आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी महिला आरोपी एक कंपनी चालवत होती. याप्रकरणी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एनसीबी अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT