Maharashtra Reservation: "फडणवीस आपल्या पैशाने कोर्टात वकिल पाठवताहेत"
मुंबई: भाजप (BJP) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आरक्षण कायद्याच्या विरोधात व मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी दोन्ही बाजूने खेळत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषदेत केला. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आज महाविकास आघाडी सरकारची संयुक्त पत्रकार परिषद झाली. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. न्यायालयाने 26 मार्च रोजी झालेल्या सुनावणीवेळी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज पाच सदस्यीय घटनापीठाने याबद्दलचा निर्णय दिला. या मुद्द्यावरून नवाब मलिक यांनी भाजपला लक्ष्य केलं. (NCP Leader Nawab Malik slams BJP Devendra Fadnavis Maratha Reservation)
"राज्य सरकार मराठा आरक्षण मिळायला हवे, या भूमिकेत आहे. मात्र भाजपचे देवेंद्र फडणवीस सपशेल खोटं बोलत आहेत. आपल्या पैशाने कोर्टात वकिल पाठवत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणातही माजी पोलीस आयुक्तांना दिलेला वकील भाजपशी संबंधित आहे. न्यायालयीन लढाईसाठी देवेंद्र फडणवीस यांची फूस होती. आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत होते. आज जे वकील कोर्टात लढत आहेत, त्यांना पाठबळ भाजपचे आहे. महाराष्ट्र अशांत करण्याचे काम भाजप करत आहे", असेही नवाब मलिक म्हणाले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणतात...
"मराठा आरक्षण कायदा रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दुर्दैवी व धक्कादायक आहे. राज्य सरकार तसेच संबंधित संघटनांनी अतिशय निर्धारपूर्वक हिरीरीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. तरीही अनपेक्षित निकाल हाती आला. राज्य सरकार सर्व संबंधितांशी विचारविनिमय करून पुढील योग्य ती भूमिका ठरवेल. दरम्यान सर्वांनी कृपया शांतता राखावी", असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.