पवार यांची भेट घेतल्याचा फोटो फडणवीसांनी स्वत: केला होता पोस्ट
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी गुप्त भेट (Secret Meeting) झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये दिसल्या. ती भेट नक्की झाली की नाही, याबद्दल अद्यापही स्पष्टता नाही. तशातच सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवार यांच्या घेतलेल्या भेटीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. फडणवीस 'सिल्वर ओक'वर (Silver Oak) जाऊन शरद पवार यांना भेटले. या भेटीवर राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. (NCP Sharad Pawar BJP Devendra Fadnavis Meeting NCP Nawab Malik Reaction)
"शरद पवार यांची सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली. शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी त्यांच्या तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सदिच्छा भेट घेतली. यात कोणताही राजकीय हेतू नव्हता. इथे व्यक्तिगत नाती टिकवली जातात", असं स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिलं.
"महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांचे शत्रू नसतात. आपल्या राज्यात तसं काम केलं जात नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे व्यक्तिगत नाती टिकवली जातात. शिवाय व्यक्तिगत गाठीभेटी या होत असतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणे चुकीचं आहे. विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करत असतो तर सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचे काम करत असतात. महाविकास आघाडी शरद पवार यांनीच बनवली आहे. त्यामुळे कुणीही या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करू नये. फडणवीसांनीही या भेटीला सदिच्छा भेट असल्याचेच म्हटले आहे", असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.