मुंबई : हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा येत्या २३ जानेवारीला विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. या तैलचित्र निर्मितीच्या प्रक्रियेत ठाकरे कुटुंबीयांना विश्वासात घेतले नसल्याची माहिती आहे. तसेच या अनावरण सोहळ्यालाही ठाकरे कुटुंबीयांना बोलावले नसल्याचे कळते.
येत्या २३ जानेवारीला या तैलचित्राचा अनावरण सोहळा विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडणार आहे. या तैलचित्राच्या निर्मितीचे काम सध्या सुरू आहे. काही चित्रकारांकडून या तैलचित्राचे नमुने आणि त्यांचे मत मागविण्यात येतअसल्याचे विधानमंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कलाकारांचे या तैलचित्राशी संबंधित मत घेऊनच त्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. विधानभवनातील तैलचित्र लावण्याच्या प्रक्रियेनुसार असे तैलचित्र हे संबंधितांच्या कुटुंबीयांना दाखवून त्यांचे मत विचारात घेतले जाते. तसेच तैलचित्र अनावरणाच्या कार्यक्रमालाही निमंत्रित केले जाते.
परंतु ठाकरे कुटुंबीयांना मात्र या तैलचित्राच्या निमित्ताने कोणत्याच प्रकारची विचारणा झालेली नाही. तसेच कार्यक्रमालाही निमंत्रित केले नसल्याची माहिती आहे. तैलचित्राच्या बाबतीत निमंत्रित केले की नाही, हे ठाकरे कुटुंबीय मुंबईत आल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी दिली. बाळासाहेबांसारख्या नेत्याचे अत्यंत घाईगडबडीत केलेले तैलचित्र असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी यानिमित्ताने दिली.
तैलचित्राच्या गुणवत्तेत तडजोड नाही - अॅड राहुल नार्वेकर
विधीमंडळात सन्मानीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारख्या जेष्ठ नेते आणि महाराष्ट्राला अभिमान आहे अशा व्यक्तीचा तैलचित्र मध्यवर्ती सभागृहात लावण्यात येणार आहे. या तैलचित्राच्या निमित्ताने महाराष्ट्र विधानमंडळ आणि अध्यक्ष म्हणून मी स्वतः हे तैलचित्र योग्य आणि उत्तम दर्जाचे असावी याची काळजी घेत आहोत.
तसेच तैलचित्राच्या गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विविध कलाकारांकडून सर्वोत्कृष्ट तैलचित्र बसवण्याची कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिली. तैलचित्राच्या गुणवत्तेच्या निमित्ताने विधीमंडळाने काळजी घेतली आहे.
तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुटुंबीयांसाठी योग्य प्रोटोकॉलनुसार ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे त्या करण्यात येतील, असेही ते म्हणाले. तैलचित्र कुटुंबीयांना दाखवण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी विधीमंडळ अत्यंत जबाबदारीने हे तैलचित्र तयार करत असून असा कोणताही नियम किंवा पद्धत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
विधीमंडळाच्या परंपरा तसेच संकेत प्रथेनुसार तैलचित्राशी संबंधितांच्या कुटुंबीयांना निमंत्रित करण्यात येते. याआधी विनायक सावरकरांचे चित्र लावले त्यावेळीही त्यांच्या कुटुंबीयांना बोलावण्यात आले होते. परंतु लिखित स्वरूपात असा कोणताही नियम नसल्याची प्रतिक्रिया विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.