मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि भाजपाकडून (BJP) होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केले असून, यामध्ये त्यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्र परिवारावर 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच राऊतांची लवकरच तुरुंगात रवानगी होणार असल्याचे देखील विधान केले होते. त्यांच्या या आरोपांना राऊत यांनी ट्वीट करत प्रतिउत्तर देत विरोधकांना इशारा दिला आहे. (Shivsena Leader Sanjay Raut Tweet )
संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गंभीर आरोप केले जात आहे. अवढेच नव्हे तर, अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा केवळ गैरवापर केला जात असून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.” असा संजय राऊत यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.