मुंबई- कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. सध्या मुंबईत लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात थोड्या फार प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. राज्य सरकारनं मिशन बिगीन अगेन या अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल केलेत. दरम्यान आता मुंबई महापालिकेनं सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यात नियमावलीत दुकानांना आता नियमित वेळेप्रमाणे सुरु ठेवण्याची परवानी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. मात्र यात पालिकेकडून काही अटींचाही उल्लेख करण्यात आला आहे.
पालिकेच्या नियमावलीत सर्व मार्केट, मार्केट परिसर, दुकानं पूर्ण वेळ सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पालिकेच्या या सुधारित नियमावलीत सर्व दुकानं आणि मंडई सोमवार ते शनिवार पूर्ण वेळ सुरु राहणार आहेत. यामधून मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सला वगळण्यात आलं आहे.
मोठी बातमी - सोनू सूद आणि उद्धव ठाकरे यांच्यात 'त्या' रात्री मातोश्रीवर काय झाली होती चर्चा? वाचा...
तसंच खुल्या जागेतील व्यायामाची साधनं, ओपन जिम, गार्डन, प्ले एरिया बंदच राहतील. यावेळी मुंबई महापालिकेने काही अटींचा उल्लेख केला आहे. राज्य सरकारने याआधी लावलेला सम-विषयचा नियम पालिकेनं कायम ठेवला आहे. त्यामुळे मुंबईत आधीच्या नियमाप्रमाणे रस्ते, गल्ली, परिसरात असणारी एका बाजूची दुकानं सम-विषम पद्धतीनं सुरु असतील.
नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी मार्केट तसंच दुकान मालकांनी सहभागी होऊन योग्य ती व्यवस्था करावी तसंच सोशल डिस्टन्सिंग आणि वाहतुकीची व्यवस्था करावी असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मोठी बातमी - मोठी बातमी! गायीच्या शरीरातील अँटीबॉडीज कोरोनावर ठरतील गुणकारी? वाचा कोणी केलाय हा दावा...
ठाकरे सरकारचं मिशन बिगीन अगेन
संपूर्ण राज्यात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. मात्र ठाकरे सरकारनं लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मिशन बिगीन अगेन हे नवे धोरण राबवत आहे. या धोरणानुसार तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्यात. त्यातला पहिला टप्पा 3 जूनपासून सुरु झाला. तर दुसरा टप्पा 5 जूनपासून आणि तिसरा टप्पा 8 जूनपासून सुरु करण्यात आला आहे.
new notification regarding corona 2019 lockdown issues by BMC read full news
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.