New Year 31st celebration Mumbai Police Operation All Out criminal arrested mumbai sakal
मुंबई

New Year : नवीन वर्षाच्या पार्श्भूमीवर मुंबई पोलिसांचे 'ऑपरेशन ऑल आऊट'...

31 डिसेंबरच्या पार्श्भूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत कारवाई केली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 31 डिसेंबरच्या पार्श्भूमीवर मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईत ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी फरार, वाँटेड, तडीपार आरोपींना पकडले असून एनडीपीएस कायद्यांतर्गत अंमली पदार्थ तस्करांवरही कारवाई केली आहे.

याबरोबरच बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर देखील कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी 29 डिसेंबर रोजी रात्री ही कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजीच्या रात्री नवीन वर्षाच्या आगमनानिमित्त शहरात गर्दी होते.

त्या अनुषंगाने मुंबई शहरात काल 29 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजल्यापासून आणि म्हणजे 30 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजेपर्यंत ऑल आऊट ऑपेरेशन राबविण्यात आले होते. मुंबई शहरातील सर्व पाच प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त,

अपर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, 13 परिमंडळीय पोलिस उपआयुक्त, पोलिस उपआयुक्त विशेष शाखा आणि सुरक्षा, 41 विभागीय सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात ऑल आऊट ऑपेरेशनची कार्यवाही केली..

223 कोंबिंग ऑपरेशन

मुंबई शहरात 223 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये अभिलेखावरील 1471 आरोपी (रेकॉर्डवरील) तपासण्यात आले. त्यामध्ये 271 आरोपी मिळून आले. त्यांच्यावर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे.सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत 178 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यामध्ये 8690 दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली आणि मोटार वाहन कायद्यान्वये 2300 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

29 फरारी अटकेत

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल आऊट ऑपेरेशनमध्ये मुंबई पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील 29 फरारी आरोपींना अटक केली. अंमली पदार्थ खरेदी आणि विक्री करणाऱ्या संशयितांवर अंमलीपदार्थ विरोधी कायद्याअन्वये 164 कारवाया करण्यात आल्या.

अवैध शस्त्र बाळगणाऱ्या 31 जणांवर कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी आणि इतर शस्त्रे जप्त करण्यात आली. अवैध दारू विक्री आणि जुगार असा अवैध धंद्यांवर 73 ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. तसेच इतर अवैध 38 धंद्यांवर छापे टाकून 55 आरोपीतांना अटक करण्यात आली.

तडीपारांवर कारवाई

मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले परंतु, मुंबई शहरात विना परवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने 64 कारवाया करण्यात आल्या. संशयितरित्या वावरणारे 148 जणांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत 353 फेरीवाल्यांवर कारवाया करण्यात आल्या.

वाहतूक पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. याबोबरच मोटार वाहन कायद्यान्वये तब्बल 2300 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यातील 60 वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली आहे. कलम 185 मोवाका अन्वये 60 वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या0 अनुषंगाने 872 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली. याबरोबरच 555 संवेदनशिल ठिकाणची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT