mumbai police Sakal
मुंबई

Mumbai Police: नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अ‍ॅक्शन मोडवर...सुरक्षेसाठी 11500 पोलीस तैनात

राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पोलीस आणि क्विक रिअ‍ॅक्शन टीम (क्यूआरटी) यांच्यासह 12000 हून अधिक पोलीस कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले जातील.

Sandip Kapde

मुंबई: कोरोना प्रतिबंधानंतर दोन वर्षांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज आहेत. मुंबईतील प्रमुख ठिकाणी मुंबईकर जनता मोठ्या प्रमाणात जमणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीसांकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख ठिकाणी 11500 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, उपनगरी वांद्रे, बँडस्टँड आणि इतर प्रमुख ठिकाणांजवळ मोठी गर्दी जमू शकते. या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत. (Latest Marathi News)

राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पोलीस आणि क्विक रिअ‍ॅक्शन टीम (क्यूआरटी) यांच्यासह 12000 हून अधिक पोलीस कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले जातील. या मध्ये 11500 पोलीस हवालदार, 2051 अधिकारी, 22 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 7 अतिरिक्त पोलीस आयुक्त सुरक्षा तैनातीचा भाग असतील.

याशिवाय, 46 राज्य राखीव पोलीस दल प्लाटून, 3 दंगल नियंत्रण पोलीस तुकड्या आणि 15 क्यूआरटी तुकड्या देखील तैनात केले जातील. सुरळीत वाहतुक व्यवस्थापनासाठी 31 डिसेंबर रोजी अतिरिक्त वाहतूक पोलिसही ड्युटीवर असतील. (Mumnai Police)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT