Editor Samrat Phadnis sakal media
मुंबई

इंटरनेटच्या आक्रमणातही विश्वासार्हतेमुळे वर्तमानपत्रे टिकून राहतील - सम्राट फडणीस

कृष्ण जोशी

मुंबई : चांगल्या उपयोगांबरोबरच समाजमाध्यमांचे धोके (Social media) व तोटेही समोर येत आहेत. त्यामुळे तुम्ही आम्ही एक वस्तू (object) झालो आहोत व आपल्याला विविध उत्पादने विकली जात आहेत. यावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी आपापले उपाय वापरून एकत्रितपणे मार्गक्रमण केले तरच या पेचप्रसंगातून आपण बाहेर पडू, असे सकाळ (sakal) (पुणे आवृत्ती) चे संपादक सम्राट फडणीस (Samrat Phadnis) यांनी सांगितले. तसंच इंटरनेटच्या (Internet) आक्रमणातही विश्वासार्हतेमुळे वर्तमानपत्रे (Newspaper) टिकून राहतील, असा विश्वासही फडणीस यांनी व्यक्त केला.

सन २००५ मध्ये भारतात जेमतेम एक कोटी लोक इंटरनेट वापरीत होते. आता ही संख्या प्रचंड वाढली असल्याने इंटरनेटचा वापरही वेगवेगळ्या हेतूंसाठी होत आहे. चांगली माहिती देण्याबरोबरच आक्रमकपणे चुकीची माहिती देणे, गट तयार करणे, त्यातून हवी तीच माहिती पुढे दामटणे, असे अनेक प्रकार होऊ लागले. त्यामुळे माणसांचा एककल्लीपणा वाढला, मी सर्वात आधी माहिती देणार या स्पर्धेतून चुकीची माहिती दिली गेली, माहितीचे चांगले स्रोत तुटत गेले, समाजाबद्दलचे आकलन कमी होत गेले, चांगल्यासाठी इंटरनेटचा वापर हा हेतूच नष्ट झाला आहे, कंपन्यांनी सरकारच्या सोयीची भूमिका घेणे असे त्यांचे स्वरुप झाले आहे, असेही फडणीस म्हणाले.

काही अपवाद वगळता भविष्यात इंटरनेटचा उपयोग लोकांच्या फायद्यासाठी होईल, याची अजिबात खात्री देता येत नाही. सरसकट लोकांना एकाच दिशेने रेटत न्या व त्या दिशेची उत्पादने पोहोचवा, या प्रक्रियेतून नागरिकांचा वस्तू म्हणून वापर केला जातो व लोकांना उत्पादने विकली जातात. सोशल मिडियाचा वापर करून अमेरिकेत आणि भारतातही निवडणुका लढविल्या गेल्या आहेत. अशाचप्रकारे कोणी राजकारण करीत असेल तर आपण मतदार रहात नाही, आपण वस्तू बनतो हे कायम लक्षात ठेवावे. हे टाळण्यासाठी आपल्याला आपापले स्वतंत्र मार्ग वापरावे लागतीलच. पण सर्वांनी एकत्रितपणे पुढे गेलो तरच या पेचप्रसंगातून बाहेर पडू, असेही फडणीस यांनी सांगितले.

समाजमाध्यमे चांगल्या कामासाठी वापरायची असतील तर तशी कामे करणाऱ्या समाजमाध्यमांवरील ग्रूपमध्ये सहभागी व्हावे हा एक उपाय आहे. अर्थात यात अडथळे खूप येतील, समाजमाध्यमे त्यासाठीच आहेत, पण ते टाळण्यासाठी आपल्यावर नियंत्रण ठेवणे हाच उपाय आहे. उदा. आपण फेसबुकवर जी चर्चा करतो, त्याच उत्पादनांच्या जाहिराती आपल्याला थोड्याच वेळात फेसबुकवर दिसायला लागतात. हे टाळायचे असेल तर फेसबुकचे सेटिंग उघडून पहा, त्यात आपण कितीतरी परमिशन त्यांना दिलेल्या असतात, त्याचा फायदा ते घेणारच. त्यामुळे या परमिशन रद्द करा, असाही उपाय फडणीस यांनी सांगितला.

फेक न्यूजचे प्रमाण सध्या पाच-दहा टक्के असून ते पन्नास टक्क्यांपर्यंत जाण्याचीही शक्यता आहे. त्याच्या प्रसाराविरोधात इंडियन न्यूजपेपर सोसायटी किंवा वॅन इन्फ्रा या संघटना किंवा बातमीची खातरजमा करणाऱ्या न्यूज एजन्सी काम करीतच आहे. मात्र एखादी अफवा पसरली तर आम्ही त्याबाबत सत्यस्थिती पडताळून ती समाजमाध्यमांवर सांगतो. त्याचबरोबर ही अफवा आहे असे सांगण्याऐवजी अफवा पसरवू नका, असेही सर्वांना सांगतो, असा सोपा उपायही फडणीस यांनी सांगितला.

विश्वासार्हता असलेली माध्यमे टिकून राहतातच, ती संपत नाहीत. इंटरनेटच्या आक्रमणातही विश्वासार्हतेमुळे वर्तमानपत्रे टिकून राहतील. किंबहुना यापूर्वीही वेगवेगळ्या माध्यमांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी वर्तमानपत्रांनी सुयोग्य बदल केले. रंगीत टीव्हीमुळे वर्तमानपत्रेही रंगीत झाली, असेही फडणीस यांनी दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT