मुंबई: एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझेंच्या घराची झडती घेतली आहे. या झडतीत अधिकाऱ्यांनी दोन सदरे जप्त केले आहेत. गुन्ह्या दरम्यान त्यांनी या दोन्ही सदराचा वापर केला होता. एनआयएला तपासात मिळालेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात पीपीई किट नव्हता, तर तो पांढरा कुर्ता होता. CCTV मध्ये तो PPE किट वाटत होता. मात्र आरोपीनं संपूर्ण अंग झाकण्यासाठी पांढऱ्या रंगाचा सदरा घातला होता. त्यानंतर एनआयएनं त्या अँगलनं तपास सुरु केला होता.
गुन्ह्यात वापरले दोन सदरे NIA च्या अधिका-यांनी जप्त केले आहेत. सचिन वाझे यांनी त्यातला एक सदरा मुलूंड टोलनाक्याजवळ केरोसीनने जाळला होता. तसंच काल रात्री वाझेंच्या घराच्या झडतीत एक कार जप्त केली आहे. कारमध्ये काही महत्वाचे पुरावे सापडले आहेत. दरम्यान अन्य इतर तीन कारचा शोध NIA कडून सुरु आहे.
वाझेंसोबत जो दुसरा व्यक्ती कटात होता त्याचाही शोध लागला असून तो सध्या NIA च्या ताब्यात आहे. ती व्यक्ती पोलिस दलातील असल्याची माहिती NIA सुत्रांनी दिली आहे. तसंच हा संपूर्ण कट पब्लिसीटीसाठी केला असल्याची दाट शक्यता NIA ला आहे.
सचिन वाझेंचा मोबाईल आणि डिजिटल पुरावे NIAच्या ताब्यात
सचिन वाझे यांच्या सीआययू कार्यालयात एनआयएने शोध मोहिम राबवली असून वाझे यांचा मोबाईलसह कागदपत्र आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत गुन्हे शाखेच्या सात पोलिसांची चौकशी एनआयएने केली आहे. याशिवाय वाझे यांच्या इमारतीतील डीव्हीआर जप्त करण्यात आले.
कोण आहेत सचिन वाझे?
1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात उपनिरीक्षक पदापासून झाली. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरातून सेवेची सुरूवात करणा-या वाझे ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे प्रसिद्धीला आले. 2002 घाटकोपर स्फोटातील संशयित आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता. ख्वाजा युनुस प्रकरणी वाझे यांच्यासह 1 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पुढे न्यायालयीन प्रक्रियाही चालली. वाझे यांच्यासर इतर विविध प्रकरणांमध्ये निलंबित 18 पोलिसांना सेवेत सामावून घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
अर्णब गोस्वामी यांना घरातून उचललं
दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना घरातून उचललं होते.
NIA officials recovered two kurta in Sachin Waze home
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.