मुंबई

मनसुख हत्या प्रकरण: एनआयए करणार 'या' मोठ्या व्यक्तींची DNA टेस्ट

पूजा विचारे

मुंबई: मुकेश अंबानी जिलेटीन आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी आरोपी सचिन वाझे, विनायक शिंदे, नरेश गोर आणि आणखी काही जणांचा डीएनए तपासणार असल्याची माहिती समोर आली आहे. NIAच्या सूत्रांनुसार, ज्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत त्या गाड्यांमधून फॉरेन्सिक टीमला मिळालेल्या पुराव्यानुसार आरोपीचे डीएनए आणि गाड्यांमध्ये सापडलेल्या साहित्यावरील डीएनए पडताळणार आहेत.  एक ते दोन दिवसात NIA ला हा रिपोर्ट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दोन मर्सिडीज, इनोव्हा, हत्येचा गुन्ह्यात वापरली गेली असावी असा संशय असणारी वोल्व्हो आणि प्राडो गाडीतून फॉरेन्सिक टीमने नमूने घेतले आहेत. आरोपी सचिन वाझे, विनायक शिंदे, बुकी नरेश गोर आणि इतर काही जणांचे डीएनए घेऊन फॉरेन्सिक टीम सीएफएसला घेऊन गेल्याची माहिती आहे. सध्या NIA कडून ठोस पुरावे मिळवण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान मनसुख हिरेनला मारण्यासाठी क्लोरोफॉर्मचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या क्लोरोफॉर्म लावल्यानंतर बेशुद्ध मनसुखच्या तोंडात मोठ्या प्रमाणात रुमाल कोंबले, अशी माहिती मिळतेय. त्यानंतर मनसुखला खाडीत फेकले. दरम्यान गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कार नोव्हेंबर २०२० मध्ये सचिन वाझेंनी विकत घेतली होती, अशी माहिती मनसुखचा भाऊ विनोदनं ATS ला दिली आहे. त्यामुळे ही कार वाझेंनी  पोलिसांच्या अनेक कारवाईमध्ये वापरल्याचा संशयही ATSला आहे. मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये ती कार पुन्हा वाझेंनी मनसुखला आणून दिली.  गुन्हा घडल्यानंतर ही कार मी वापरत नसल्याचे पोलिसांना सांगण्यासाठी ही मनसुखवर वाझेंनी दबाव टाकला असल्याचंही समजतंय. 

NIA Will Accused Sachin Waze Vinayak Shinde Naresh Gor DNA tested

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT