मुंबई

दिलासादायक! मुंबईतील 'ही' ९ रुग्णालयं आता नॉन कोविड, पालिकेचा निर्णय

भाग्यश्री भुवड

मुंबईः  कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना दुसरीकडे पावसाळी आजार वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत आता पावसाला सुरुवात झाली असून मलेरिया, डेंग्यूचे, हीवताप, डेंग्यू यासारखे आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. कोरोनासोबत या रुग्णांवरही सोयीस्करपणे उपचार व्हावे यासाठी पालिकेची 9 कोविड रुग्णालये 'नॉन कोव्हिड' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई महानगर पालिकेने उपनगरातील 16 रुग्णालये कोविड रुग्णालय म्हणून घोषित केली होती. त्यापैकी 9 रुग्णालये ही सोमवारपासून पूर्णपणे नॉन कोविड होऊन इथे फक्त इतर आजारांच्या रुग्णांवरच उपचार केले जातील अशी माहिती पालिका रुग्णालयांचे प्रमुख आणि संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. 

या नॉन कोविड रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करुन घेतले जाणार नाही. मात्र, या नॉन-कोविड रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सुरू राहील आणि या रुग्णालयांत आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना कोविड केंद्रांत पाठवले जाईल. शिवाय गरज असल्यास नायर, केईएम, सायन रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुंबईत सध्या पावसाळ्यातील मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे आजारांचे रुग्ण आता दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे, कोरोनाच्या रुग्णांना जम्बो सुविधेत शिफ्ट केले जाणार आहे. त्यासाठी, हळूहळू तरतूद करुन उपाययोजना केल्या जाणार आहेत. जम्बो सुविधेतही जवळपास 300 हून अधिक आयसीयू बेड्सची सोय केली गेली आहे. त्यामुळे, कोरोना रुग्णांना प्राधान्याने कोविड सेंटर मध्ये पाठवले जाईल. बाकी जे रुग्णालयातील बेड्स असतील ते पावसाळी आजारांच्या रूग्णांसाठी प्राधान्याने दिले जातील असं ही डॉ. भारमल यांनी स्पष्ट केलंय.

नायरमध्येही घेणार इतर आजारांचे रुग्ण

पालिकेचे नायर रुग्णालय हे पूर्णपणे कोविडसाठी देण्यात आले आहे. मात्र, आता इथे ही हळूहळू एक-एक विभाग सुरू केला जाईल. येत्या दोन ते तीन दिवसांत कार्डिओलॉजी विभाग सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. सुपरस्पेशालिटी जे विभाग आहेत ते ही सुरू होतील, असंही डॉ. भारमल यांनी सांगितले आहे. 

एप्रिलपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने तसेच उपनगरातील रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभासह 16 रुग्णालये कोविड रुग्णालय म्हणून घोषित केली होती. पण, आता रुग्ण संख्या हळूहळू कमी होत असल्याने तसेच कोविड केंद्रांच्या रुपाने मोठ्या संख्येने खाटा उपलब्ध झाल्याने आता उपनगरातील 16 पैकी 9 रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होणार नाहीत. येथे आलेल्या कोरोना रुग्णाला वांद्रे कुर्ला संकुल, वरळी एनएससीआय कोविड केंद्रामध्ये किंवा गरज पडल्यास सायन, नायर, केईएममध्ये दाखल करण्यात येईल. तर, सायन, केईएम आणि नायरमध्ये कोविड तसेच नॉन कोविड दोन्ही रुग्णांवर उपचार राहतील. पण, अधिकाधिक रुग्णांवर आता कोव्हिड सेंटरमध्येच सामावून घेण्यात येणार असल्याचे डॉ. भारमल यांनी सांगितले आहे. 

तसेच नऊ रुग्णालयांसह 186 पैकी 160 दवाखानेही आता नॉन कोविड करण्यात आले आहेत. त्यामुळे, आता केवळ 26 दवाखाने कोविड असणार आहेत. तर 28, प्रसुतीगृह पैकी आता केवळ तीन प्रसुतिगृह कोविड तर उर्वरित 25 नॉनकोविड असतील, असे सांगण्यात आले आहे. दरवर्षी, शेकडो मुंबईकर पावसाळी आजारांना बळी पडतात. अशा प्रकारे रुग्णालयांना नॉन कोविड करणं हे स्पष्ट करतंय की मुंबईत कोरोनाचे सावट निवळत आहे. 

वरळीच्या कोविड केअर सेंटरमधील आयसीयू फुल्ल

वरळीच्या एनएससीआय या कोविड सेंटरमध्ये सध्या 280 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 235 बेड्स सद्यस्थितीत रिकामे आहेत. शिवाय, आयसीयू पूर्णपणे भरली असल्याची माहिती एनएससीआय प्रमुख डॉ. नीता वर्टी यांनी दिली आहे.

संपादनः पूजा विचारे

nine hospitals in Mumbai are now non covid decision of municipality

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS : लागली वाट! सर्फराजनंतर सराव सामन्यात आणखी एका प्रमुख फलंदाजाला दुखापत, विराट कोहली तर...

Amit Shah : सोरेन सरकारची उलटगणती सुरू...अमित शहा : सोरेन सरकारने केंद्राचा निधी हडप केला

Stock Market Today: आज शेअर बाजार बंद राहणार; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही व्यवहार होणार नाही

Thane: पहिल्या मजल्यावरील घरात अचानक लागली आग अन्... वाचा पुढे काय झालं

Healthy Morning Tips: सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी करा 'या' पानाचे सेवन, दिवसभर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहील

SCROLL FOR NEXT