BMC sakal media
मुंबई

मुंबई: ९ पैकी ४ जंबो कोविड केंद्र तोडण्यास सुरुवात; महापालिका आयुक्तांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पालिकेने (BMC) मुंबईतील नऊपैकी चार जम्बो कोविड केंद्रे (jumbo corona center) हटवण्यास सुरुवात केली आहे. चारही केंद्रांमधील औषधे, उपकरणे आणि ऑक्सिजन पीएसए प्लांट्स मुंबईच्या रुग्णालयांत हलवण्याची योजना पालिका आखत आहे. २०२० मध्ये पालिकेने कोविड रुग्णांसाठी (corona patients) नऊ जम्बो केंद्रे सुरू केली होती. मात्र, आता रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने ती काढली जात आहेत. गोरेगाव नेस्को, दहिसर, कांजूरमार्ग आणि मुलुंड जम्बो कोविड केंद्रांतील औषधे, उपकरणे, प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन (पीएसए) प्लांट आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) साठवण टाक्या हलवण्याची योजना आखली गेली आहे. लवकरच चार जम्बो कोविड केंद्रे तोडण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (suresh kakani) सुरेश काकाणी यांनी दिली.

चार केंद्रांमध्ये ८,२०० खाटांची क्षमता आहे. गोरेगावमधील नेस्को केंद्रात सर्वाधिक ३,७०० खाटा आहेत. औषधे व उपकरणे उपनगरीय आणि प्रमुख रुग्णालयांना त्यांच्या मागणीच्या आधारे वितरित केली जातील, असे काकाणी यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशातील इतर नगरपालिकांनाही गरजेनुसार वस्तू पाठवल्या जातील. भिवंडी-निजामपूर आणि वसई-विरार महापालिकेकडून आधीच तशी मागणी केली आहे. आधी चारही केंद्रे रिकामी केली जातील आणि त्यानंतर ती तोडली जातील, असे त्यांनी सांगितले.

पालिका रुग्णालयांमध्ये यादी पाठवण्यात आली आहे. मागणीनुसार औषधे पाठवू, असे गोरेगाव नेस्को जम्बो सुविधेच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी सांगितले. पालिका रुग्णालय इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी केंद्र तोडण्याच्या प्रक्रियेसाठी अभियंत्यांशी समन्वय साधत असल्याचे दहिसर जम्बो सुविधेच्या प्रमुख डॉ. दीपा श्रियन यांनी सांगितले.

औषधांव्यतिरिक्त जम्बो सुविधा केंद्रांमध्ये नियमित आणि विशेष इंटेन्सिव्ह केअर युनिट बेड, व्हेंटिलेटर, बायपॅप मशीन, मॉनिटर्स आणि इतर रुग्णालयीन उपकरणे आहेत. तोडण्यात येणाऱ्या जम्बो केंद्रांत २६ पीएसए प्लांट आणि आठ एलएमओ टाक्या आहेत. पीएसए प्लांट आणि एलएमओ टँक मुंबईतील रुग्णालयांत वितरित केले जातील.

मुंबईतील रुग्णालयांना प्राधान्य

जंबो केंद्रातील उपकरणे वितरित करताना मुंबईतील रुग्णालयांना प्राधान्य दिले जाईल. कोणतीही उपकरणे बाहेर पाठवण्यापूर्वी आम्ही आधी शहराच्या गरजा पाहू, असे सुरेश काकाणी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT