Nitin Gadkari said I want the Congress to be strong Nitin Gadkari said I want the Congress to be strong
मुंबई

काँग्रेससाठी गडकरींचे मोठे विधान; ....अशी माझी मनापासून इच्छा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : लोकशाहीसाठी काँग्रेस मजबूत असणे आवश्यक आहे. सलग निवडणुकीत पराभूत होणारी काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी आणि पक्षाचे नेते निराश होऊन पक्ष सोडू नयेत हीच आपली इच्छा आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले. देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्याने काँग्रेसबद्दल सहानुभूती आणि प्रोत्साहन दिसून येत होते. (Nitin Gadkari said I want the Congress to be strong)

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, जवाहरलाल नेहरू हे एक उदाहरण आहे. अटलबिहारी वाजपेयी लोकसभा निवडणुकीत हरले तेव्हाही नेहरूंनी त्यांचा आदर केला. लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका खूप महत्त्वाची असते. कमकुवत काँग्रेस म्हणजे मुख्य विरोधी पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत आहेत. हे चांगले लक्षण नाही, असेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

काँग्रेस मजबूत राहावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. जे काँग्रेसच्या (Congress) विचारसरणीचे पालन करतात त्यांनी पक्षासोबत राहून खंबीर राहावे. पराभवाने खचून न जाता काम करत राहावे. पराभव झाला तर एक दिवस विजयही होणारच, असेही काँग्रेस नेत्यांना नितीन गडकरी म्हणाले.

आपली विचारधारा सोडू नका

भाजपला संसदेत फक्त दोन जागा जिंकता आल्याची वेळही त्यांनी आठवली. परंतु, कार्यकर्त्यांच्या मेहनतीने काळ बदलला आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या रूपाने आम्हाला पंतप्रधान मिळाला. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत निराश होऊन आपली विचारधारा सोडू नका, असेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

हे लोकशाहीसाठी चांगले नाही

लोकशाही दोन चाकांवर चालते. एक सत्ताधारी आणि दुसरा विरोधक. प्रबळ विरोध ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे काँग्रेस मजबूत असावी हीच माझी इच्छा आहे. त्याचवेळी काँग्रेस (Congress) कमकुवत असताना त्याचे स्थान प्रादेशिक पक्ष घेत आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. अशा स्थितीत विरोधी पक्ष मजबूत झाला पाहिजे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT