मुंबई

Raj Thackeray: मनसेने दिला दणका अन् रेल्वे आली लाईनीवर, वाचा नक्की काय आहे प्रकरण !

Mns Mumbai News : अखेर रेल्वे आरक्षणासाठीचे अर्ज त्वरित मराठीत उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Mns Ghatkopar: घाटकोपर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या तिकीट आरक्षनासाठीचे अर्ज गुजराती भाषेत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने गुजराती भाषेतील अर्जांची स्टेशन बाहेर होळी करत निषेध व्यक्त केला होता. त्यासंबंधी मनविसेकडून निवेदन देखील देण्यात आले होते. अखेर रेल्वे आरक्षणासाठीचे अर्ज त्वरित मराठीत उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले.

मनविसेचे विभाग अध्यक्ष योगेश वायाळ व सचिव ऍड अभिषेक सावंत यांच्या सह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी रेल्वे अधिकारी यांची भेट घेऊन रेल्वेचे आरक्षण अर्ज गुजराती भाषेत का ? असा प्रश्न करत अर्ज मराठीत उपलब्ध करा. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे.

राज्यातील सर्व कारभार हा मराठी भाषेतच असावा अशीही सूचना यावेळी मनविसेकडून देण्यात आली होती. मात्र काही दिवस उलटून गेल्या नंतर ही अर्ज मराठीत उपलब्ध होत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्टाईलने रेल्वे स्टेशन बाहेर गुजराती भाषेतील अर्जाची होळी करत निषेध व्यक्त केला होता. मनविसेच्या आंदोलन नंतर अखेर अर्ज मराठी उपलब्ध झाले असल्याचे मनविसेचे ऍड अभिषेक सावंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde : अन् विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून हॉटेलमधून पडले बाहेर, कारण काय?

Latest Marathi News Updates : डहाणूत बहुजन विकास आघाडीला धक्का; बविआच्या उमेदवाराचा भाजप प्रवेश

IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

FIR lodged on Vinod Tawde: आचारसंहिता भंग प्रकरणी विनोद तावडे, भाजप उमेदवार राजन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

World Men's Day : असंख्य पुरूषांच्या वाट्याला घुसमट; वेळीच मार्ग न सापडल्यास मानसिक आजारांसह व्यसनाधीनतेची भीती

SCROLL FOR NEXT