मुंबई

खालूबाज्याने दणाणली ही गावे 

सकाळ वृत्तसेवा

महाड : होळीचा सण उत्साहात साजरा झाला. आता महाड तालुक्‍यात गाव- वाड्यांवरील घरोघरी ग्रामदेवतांच्या पालख्या येऊ लागल्या आहेत. खालूबाजा, लेझीमच्या तालावर त्या नाचत आहेत. त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने "हे देवा महाराजा... होय महाराजा...' अशी गाऱ्हाणी ऐकू येऊ लागली आहेत. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास असलेले नागरिकही यानिमित्ताने गावात आले असल्याने ग्रामीण भाग गजबजला आहे. 

धक्कादायक : खेळत होती चिमुकली...अचानक असे घडले...

शिमगा म्हटला की कोकणात ग्रामदेवतेचा उत्सव सुरू होतो. प्रत्येक गावानुसार या उत्सवाच्या आगळ्या-वेगळ्या प्रथा आहेत. मुख्य होळी लावण्याआधी गावा-गावात आठ-नऊ दिवस होळ्या पेटवल्या जातात. शेवटच्या दहाव्या दिवशी होम हा मुख्य शिमगा असतो. यादरम्यान पालखीत देवतेची रूपे लावली जातात. 
शिमगोत्सवात खास आकर्षण असते ते देवाच्या पालखीचे आणि रूपे लावण्याच्या कार्यक्रमाचे. देव-देवतांचा आकर्षक असा मुखवटा या पालखीत स्थानापन्न केला जातो. तसेच देवाला सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. त्यानंतर पालखी सहाणेवर नेली जाते. मुख्य शिमगोत्सवानंतर पालखी सहाणेवरच वास्तव्य करते. त्या कालावधीत पूजा, गोंधळ असे परंपरेचे कार्यक्रम होतात. नंतर पालखी दर्शनासाठी घरोघरी नेण्याची परंपरा आहे. आता घरोघरी पालख्या दर्शनासाठी निघाल्या आहेत. 

हे वाचा : दीक्षाभूमीचा सजग प्रहरी...
परगावी असलेले नोकरदार, व्यावसायिक देवदर्शनासाठी गावी आल्याने घरे गजबजलेली आहेत. मानकऱ्यांच्या घरी पहिली पालखी ठेवली जाते. तिथून ती प्रत्येक घरी जाते. त्यावेळी सुहासिनी देवतांची खणा-नारळाने ओट्या भरतात. ओटी भरणाऱ्या कुटुंबाचे नाव घेतले जाते. "हे महाराजा, होय महाराजा, वर्षाची ओटी भरली जातेय, त्यांच्या पोराबालास सुखी ठेव, नीट सांभाळ, इडापिडी टळू दे, लगन जुळू दे, शिक्षणात यश दे', असे गाऱ्हाणे मांडले जाते. ढोल व ताशांच्या वाद्यात पालखी संपूर्ण गाव फिरते. 
......... 
डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा 
गावातील मध्यवर्ती भागात अन्यथा मंदिराजवळ पालखी नाचवली जाते. तालुक्‍यात आता पालख्या बाहेर पडल्या आहेत. काही ठिकाणी देवळात अथवा सहाणेवर पालखी ठेवली जाते. तेथे देवतांचे दर्शन घेतले जाते. डोळ्याचे पारणे फेडणारा हा अपूर्व सोहळा कोणीही चुकवत नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: राज्यात 38 जागांवर मुस्लिम लोकसंख्या जास्त; मतदारसंघात भाजपचीच सरशी, विक्रमी जागा जिंकल्या

IND vs AUS 1st Test : 8 Runs, 3 Wickets! यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर भारताचा डाव गडगडला; ऋषभ पंत, ध्रुव जुरेल ठरले अपयशी

Gas Tanker Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वारजे पुलाजवळ गॅस टँकर पलटी; मुंबईकडून साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प

Nashik Assembly Election 2024 Result : नाशिकमध्ये महिला आमदारांची पुनरावृत्ती; जिल्ह्यात 196 उमेदवारांपैकी 20 महिला

Assembly Elections 2024 : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांची बाजी

SCROLL FOR NEXT