Mumbai North East Loksabha result  sakal
मुंबई

Mumbai North East Loksabha: ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांचा विजय; मिहीर कोटेचा यांचा पराभव

Chinmay Jagtap

Mumbai North East Loksabha: मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ म्हणजेच ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मुंबईतील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गुजराती मतदार असल्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला यश मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण आता ठाकरे गटाच्या संजय दिना पाटील यांचा विजय झाला आहे. भाजपच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव झाला आहे.

मुलुंड, विक्रोळी, भांडुप, घाटकोपर हे मतदारसंघ गुजराती बहुल आहेत. अशावेळी या ठिकाणी उभे असलेले मिहीर कोटेचा यांना निवडणूक सोपी जाऊ शकते असे म्हटले जात होते. (Mumbai North East Loksabha)

याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमधील याच भागामध्ये रोड शो देखील केला होता. अशावेळी हा मतदारसंघ भाजपसाठी सोपा असेल अशी चर्चा आहे. मात्र ऐन निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं. मिहीर कोटेचा यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे संजय दिना पाटील यांना तिकीट देण्यात आलं आहे.(mumbai news)

2004 ते 2024 या काळात झालेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये या ठिकाणी दोनदा आघाडीचा तर दोनदा युतीचा विजय झाला आहे. किरीट सोमय्या 2014 साली या ठिकाणाहून खासदार म्हणून निवडून गेले. मात्र 2019 मध्ये मनोज कोटक यांना संधी देण्यात आली आणि तेही निवडून आले. मात्र त्याआधी दोन टर्म या ठिकाणी काँग्रेस निवडून आली आहे.(maharashtra news)

2019 आली मनोज कोटक यांनी ५ लाख 14 हजार मतं मिळवली तर संजय दिना पाटील यांना २ लाख 88 हजार मतं मिळाली. जवळजवळ दोन लाख 26 हजार मतांनी कोटक यांनी संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता.

यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहिला गेलो तर गुजराती, मराठी आणि मुस्लिम अशा तीन समाजाच्या मतदारांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदान केले आहे. तर कित्येक लहान वस्त्यांमध्ये मशाल चिन्ह पोहोचवण्यात संजय दिना पाटील यांना यश आलं आहे. संजय दिना पाटील यांना मतदारसंघाची चांगली ओळख आहे. अशावेळी या निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं अशी चर्चा आहे.(marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - ते ट्वीट खरं ठरलं! हे स्पर्धक ठरले 'बिग बॉस मराठी ५' चे टॉप ३ स्पर्धक

Sports Bulletin 6th October 2024: भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर विजय ते रोहित शर्माला पत्नीसमोर तरुणीनं केलेलं प्रपोज

Bopdev Ghat Rape Case : बोपदेव घाट आत्याचार प्रकरणातील नराधम अद्यापही फरार; पोलिसांकडून २०० संशयितांची कसून चौकशी

Nashik Fraud Crime : वर्क फ्रॉम होम, शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष भोवले; सायबर भामट्याने घातला 37 लाखांना गंडा

Latest Maharashtra News Updates: : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील अलीपूर बॉडी गार्ड लाइन्स येथे दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन केले

SCROLL FOR NEXT