Lok Sabha 2024  sakal
मुंबई

Lok Sabha 2024 : भूषण पाटील देणार का पियुष गोयल यांना धक्का?

Chinmay Jagtap

Lok Sabha 2024 : भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईमध्ये यंदा भाजपाने पियुष गोयल यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने या निवडणुकीमध्ये भूषण पाटील यांना संधी दिली आहे.

सुरुवातीला हा मतदारसंघ काँग्रेसचा गड राहिला होता. मात्र राम नाईक आणि गोपाल शेट्टी या दोन मातब्बर नेत्यांमुळे या ठिकाणी भाजपने आपली मूळ रोवली. भाजप - शिवसेना युती असल्यामुळे शिवसेनेचा मतांचाही भाजपला या ठिकाणी चांगलाच फायदा झाला होता.

2014 नंतर मोदी लाटेमध्ये गोपाळशेट्टी या ठिकाणी दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले. मात्र यंदा त्यांचा पत्ता कट करण्यात आला आणि मंत्री पियुष गोयल यांना या ठिकाणी निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. भूषण पाटील हे मराठी असल्याने मराठी विरुद्ध गुजराती असा सामना या ठिकाणी रंगवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पियुष मोबाईल यंदा प्रथमच लोकसभा निवडणुक लढवत आहेत. मात्र बोरिवली आणि कांदिवली भागात भाजपचीत चांगली पकड असल्यामुळे या ठिकाणी पियुष गोयल सहज निवडून येतील असे चित्र आहे.

असे जरी असले तरी देखील भूषण पाटील हे जनसंपर्क असलेले स्थानिक उमेदवार असल्याने आणि स्वतः मराठी असल्याने भूषण पाटील यंदा निवडणूक जिंकू शकतात असेही म्हटले जात आहे. मात्र अखेर जनता नक्की कोणाला कौल देते हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT