again heavy rain in mumbai  
मुंबई

चार तासाहून जास्त वेळ पाणी थांबलं नाही - मुंबई महापौर

दोन-तीन ठिकाणी पाणी आहे. ते गुडघ्याच्या खाली आहे.

दीनानाथ परब

मुंबई: "सकाळी मोठा पाऊस झाला. भरतीची वेळ होती. त्यावेळी शहरात पाणी साचलं होतं. आता पाणी भरलेलं (water logging) नाही. निचरा झालेला आहे. मुंबईत पाणी भरणार नाही असा दावा केलेला नाही. करणार नाही. पाणी भरल्यानंतर चार तासाच्या आता पाण्याचा निचरा झाला नाही, तर केलेलं काम चांगलं नाही, असं म्हणू शकतो" असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) म्हणाल्या. मोसमातील पहिल्याच पावसाचा (mumbai rain) मुंबईला फटका बसला आहे. सखल भागासह ठिकठिकाणी मुंबईत पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला. पाणी तुंबल्यामुळे विरोधी पक्षांनी मुंबई महापालिकेतील (bmc) सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली. (Not more than four hours water logging in mumbai mumbai mayor kishori pednekar)

"मुंबईच्या पलीकडे पुण्यातही पाणी तुंबलय. जे पाणी साचलं ते चार तासांच्यावर शहरात थांबत नाहीय. १९५ मीमी, १३७ मीमी पाऊस झाला. ८५ मीमी पाऊस झाला असता, तर ते भूमिगत टाक्यांमध्ये ते पाणी वळवता आलं असतं. सकाळपासून पाऊस सुरु होता. समुद्राचे दरवाजे बंद होते. आता पावसाच्या पाण्याचा निचरा झाला आहे. दोन-तीन ठिकाणी पाणी आहे. ते गुडघ्याच्या खाली आहे. काही नाले समुद्राच्या खूपच खाली आहेत. ज्या उपयोजना २००५ पासून करत आलो. त्यामुळे आधी मुंबई २ ते पाच दिवस ठप्प व्हायची. आता तसं होत नाही" असे महापौर म्हणाल्या.

"हिंदमाताला पाणी भरलं तरी पुलावरुन जाणारं ट्रॅफीक सुरळीत सुरु आहे. आम्ही आताच्या घडीला लक्ष ठेवून आहोत. निष्काळजीपणा दिसेल तिथे कारवाई करु, असे महापौरांनी सांगितले. विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेवर त्या म्हणाल्या की, त्यांना जे आरोप करायचे ते करुं दे. त्यांच्या आरोपांना उत्तर द्यायला बसलेलो नाही. त्यांच्या प्रशस्तीपत्रकाची गरज नाही. निंदकाचे घर असावे शेजारी, जे आवश्यक आहे ते सर्व करु" असे महापौर म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT