मुंबई - मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून पुढच्या 4 महिन्यात समुद्रात 21 वेळा 4.5 मीटर उंचीपेक्षा लाटा उसळणार आहेत. त्यामुळे, पालिकेने संपूर्ण मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली असली तरी अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतिक्षा सुरू आहे. 23 जून ते 21 सप्टेंबर दरम्यान मुंबईत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईडचा धोका हवामान खात्याने वर्तवलाय. मुंबई महापालिकेनं हायटाईडच्या दिवसांची यादी जाहीर केलीय. 23 जून ते 21 सप्टेंबर दरम्यान अरबी समुद्रात 4.5 मीटरच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेनं म्हटलंय. त्यामुळे या दिवशी नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये. पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर समुद्राजवळ जातात. पण या दिवशी मुंबईकरांनी समुद्र किनारी जाण्याचा धोका पत्करू नये.
या दिवशी उसळणार उंच लाटा
दिवस - तारीख - वेळ - हाईट मीटर
note these dates these are dates of high time very important for mumbaikars
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.