वाडा ः अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी "प्रधानमंत्री किसान सन्मान योजना' ही अभिनव योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला वर्षाकाठी बारा हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जात आहे. असे असतानाच या योजनेत नोकरदार व आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यातील सुमारे 558 अपात्र शेतकऱ्यांनी हा निधी घेतल्याचे गेल्या काही महिन्यांत सरकारच्या निर्दशनास आले.
558 अपात्र शनिवार शेतकऱ्यांना शनिवार (ता. 15) पूर्वी फसवणूक करून लाटलेला निधी पुन्हा शासकीय तिजोरीत भरण्याची नोटीस वाड्याचे तहसीलदार उद्धव कदम यांनी दिले आहेत. नियोजित वेळेत रक्कम न भरल्यास फौजदारी अथवा दंडात्मक कारवाई कारण्याचा इशाराही नोटिसीत तहसीलदारांनी दिला आहे. तहसीलदारांच्या नोटिसीने या प्रकरणाने अपात्र शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, तालुक्यातील काही अपात्र शेतकऱ्यांनी आतापर्यंत सुमारे दोन लाखांचा निधी शासकीय तिजोरीत भरला असल्याची माहिती नायब तहसीलदार सुनील लहांगे यांनी दिली आहे.
प्रशासनाच्या चुकीचा शेतकऱ्यांना फटका
केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना अमलात आणल्यानंतर या योजनेचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना देण्यात आला. या योजनेसाठी गावस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक व सहकारी सोसायट्यांचे सचिव असे कर्मचारी काम करीत होते. त्यावेळी त्यांनी योजनेचे निकष अथवा उद्देश लक्षात घेतले नाहीत का ? सरसकट लाभ नोकरदार व आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही कसा दिला, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत; तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे उद्देश अथवा निकषांची पायमल्ली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अंकिता दुबेले यांनी केली आहे.
Notice to farmers to return money from Kisan Sanman Yojana in Wada taluka
( संपादन ः रोशन मोरे)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.