sachin-waze 2.jpg 
मुंबई

१०० कोटी वसुली प्रकरण: CBI ला मिळाली सचिन वाजेच्या चौकशीची परवानगी

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?

सुरज सावंत

मुंबई: अँटिलिया कार स्फोटक (car explosive) आणि मन्सुख हिरेन (mansukh hiren) हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सचिन वाजेची (sachin waze) चौकशी करण्यास सीबीआयला न्यायालयाने (cbi court) परवानगी दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाजेला महिन्याला १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात केला होता. त्या प्रकरणात सीबीआय आता सचिन वाजेची चौकशी करणार आहे. १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीपाठोपाठ सीबीआयनेही कोर्टात वाजेची चौकशी करण्यासाठी अर्ज केला होता. (Now cbi got permission from court to inquiry sachin waze)

सीबीआयच्या या मागणीला न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार, सीबीआय १०० कोटी वसुली प्रकरणात लवकरच सचिन वाजेची तळोजा कारागृहात जाऊन चौकशी करण्याची शक्यता आहे. वाजे आरोपी असून एनआयएने त्याला अटक केली. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.

१०० कोटीच्या वसुलीच्या आरोपाचे राज्याच्या राजकारणात गंभीर पडसाद उमटले होते. अँटिलिया बाहेर कारमध्ये स्फोटकं सापडल्यापासून सुरु झालेल्या या प्रकरणाने नंतर वेगळेच वळण घेतले. या प्रकरणामुळे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. त्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. यात सचिन वाजेला महिन्याला १०० कोटीच्या वसुलीचे टार्गेच दिल्याचा आरोप होता.

त्यानंतर अनिल देशमुखांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. उच्च न्यायालयाने सीबीआयला देशमुखांची चौकशी करायची परवानगी दिली. देशमुख आता ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना ईडीने अटक केली आहे. आता सीबीआयला वाजेची चौकशी करायची परवानगी मिळाल्यामुळे, अनिल देशमुख आणखी अडचणीत येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT