मुंबई: मुंबईत कोविड-19 बाधित रुग्णसंख्येने 40 हजाराचा टप्पा गाठला आहे. त्यासोबत मुंबईत कोविड रुग्णांसाठी तात्पुरती रुग्णालये उभारणीचे काम जोरात सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत मुंबईत 7 मोठे तात्पुरते रुग्णालये उभारण्यात येत आहे. या सर्व केंद्रात अत्याधुनिक रिमोट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे कमी मनुष्यबऴावर कोरोना बाधितांवर प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे.
मुंबईत कोविड-19 रुग्णांची संख्या वाढल्यामुळे डॉक्टर,नर्सेसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक खाजगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा देण्यास तयार होत नाही. अशा वेळी उचपारासाठी या रिमोट यंत्रणा महत्वाच्या ठरताहेत. या तंत्रज्ञानामुळे इतर रुग्णालयापेक्षा अल्प मनुष्यबळावर काम चालते. केवळ आयसीयूमध्ये इतर रुग्णालयांच्या तूलनेत अर्धे मनुष्यबळ लागते.
वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडीया डोममध्ये उभारलेल्या तात्पुरत्या कोविड रुग्णालयात रिमोट डिलीवरी मॉडेल यशस्वी ठरले आहे. या केंद्रात 600 खाटा असून त्यात 40 आयसीयू खाटा आहेत. तर 100 ऑक्सिजन बेड आहेत. तर गोरेगाव नेस्को प्रदर्शन हॉलमधील कोविड केंद्र लवकरचं कार्यान्वित होणार आहे.
मुंबई महापालिका आणि सिएसआर फंडमधून हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. या रिमोट तंत्रज्ञानासाठीचा खर्च मुंबई पालिका आणि सिएसआर फंडातून करण्यात येत आहे. ही नवीन यंत्रणा उभी करण्यासाठी डॉ. मुफ्फझल लकडवाला सध्या राज्य सरकारला मार्गदर्शन करताहेत. लकडवाला यांच्या मते सध्या कुणी कोविड-19 साठी काम करायला तयार होत नाही, डॉक्टर, नर्सेसची कमतरता आहे. या परिस्थिती या तंत्रज्ञानामुळे रुग्णांवर व्यवस्थित उपचारही होत आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेचा प्रश्न मिटला आहे.वरळीच्या कोविड केंद्रात हे मॉडेल इतर सर्व ठिकाणी वापरणार आहोत असही ते म्हणाले आहेत.
काय आहे रिमोट मॉडेल:
वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इडीयाच्या कोविड केंद्रात सध्या डॉक्टर वॉर रुममध्ये बसून एकाचवेळी अनेक रुग्णांवर लक्ष ठेवतात. या केंद्रात उभारलेल्या अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या मदतीने प्रत्येक रुग्णांवर कॅमेरे झूम करुन लक्ष ठेवता येणे शक्य होते. रुग्णांची ऑक्सिजन लेवल, नाडी रिडींगही या वॉर रुममधून तपासली जाते. या केंद्रात मोठ्या एलईडी स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. या स्क्रिनद्वारे 24 तास या रुग्णांवर डॉक्टरांची नजर असते. सध्या या केंद्रात 350 कोविड रुग्ण उपचार घेत आहे.
या केंद्रात डॉक्टर, नर्ससाठी काचेच्या कॅबीन तयार करण्यात आल्या आहेत. रुग्णांचा स्पर्श न होता डॉक्टर रुग्णांची तपासणी केली जाते. त्यामुळे या केंद्रात संसर्गाचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. मध्यवर्ती एसी यंत्रणामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याच्या धोका आहे हे ओळखून या यंत्रणेत अतिरीक्त लेअर निर्माण करुन विषाणूचा संसर्ग रोखण्यात आला आहे.
वरळी कोविड केंद्राची जबाबदारी सध्या डॉ निता वार्ती आणि राजीव जोशी या तज्ञ डॉक्टरवर आहे. या दोघांचेही वय 60 च्या वर असून स्वताहून त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. तंत्रज्ञान आणि रिमोट फॅसिलीटीचा जास्तीत जास्त वापर झाल्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरचा ताण कमी करण्यास मदत होत आहे. असं डॉ वार्ती यांनी म्हटलंय.
"सध्या कोरोनाचा वॉर सुरु आहे. त्यामूळे आम्ही वॉर रूम तयार केले आहेत. त्यानूसार, चार भागात उपचार केले जात आहेत. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक , कुटुंब आणि ज्यांना तात्काळ उपचारांची गरज आहे अश्या चार भागात उपचार केले जात आहे. हेल्थ केअर आणि सुविधा यात खुप फरक आहे. या सर्वासाठी एकूण 9 कॅमेरे लावण्यात आले आहेत. एकूण 4 यूनिट आहेत. तिघांमध्ये डॉक्टर्स मास्क लावुन बसतात. आणि रुग्ण बाहेर असतात. चौथ्या यूनिट मध्ये स्वाब घेतला जातो. या सर्व प्रक्रियेवर कॅमेराने नजर ठेवता येते. एखाद्या रुग्णाला तात्काळ डॉक्टरांच्या साहाय्याने उपचार दिले जातात" ,असं एनएससीआय प्रमुख, डॉ. नीता वार्ती यांनी म्हंटलंय.
मुंबईतील तात्पुरती कोविड केंद्र आणि खाटांची क्षमता:
नेस्को गोरेगाव:
खाटांची क्षमता- 3000
आयसीयू खाटा- 200
सिडको नवी मुंबई:
खाटांची क्षमता- 1800
आयसीयू खाटा- 100
एमएमआरडीए ग्राउंड:
एकुण खाटा- 1000+ 1000
आयसीयू खाटा- 100 - 150
एनएससीआय डोम:
एकुण खाटा- 600
आयसीयू खाटा- 40
महालक्ष्मी रेस कोर्स:
एकुण खाटा- 800
आयसीयू खाटा- 126
दहिसर:
एकुण खाटा- 1000
आयसीयू खाटा- 100
now covid centers has taken new remote control model to treat patients
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.