मुंबई

अनेक कोरोना रुग्णांना मिळणार 'मोठा' दिलासा, धारावीकर 'असेही' उभे राहणार कोविड रुग्णांच्या मदतीला

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना संसर्गामुळे चर्चेत आलेली धारावी प्लाझ्मा दानासाठी देखील पुढे येणार आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची पालकेकडून तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत जे रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या सक्षम ठरतील अशांकडून प्लाझ्मा घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.

धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या पाच दिवसात तपासणी करणार आहोत. त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अशांकडून शिबीरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे शिबीर देशात एक वेगळा उपक्रम ठरेल असा विश्वास आयुक्त चहल यांनी व्यक्त केला. मोठा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात अँटीजेन चाचण्यांची संख्या वाढविण्यावरही भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

कोरोना संसर्गामुळे धारावी चर्चेत आली होती. धारावीत आतापर्यंत 2492 जण बाधित झाले. त्यातील 2095 रुग्ण बरे झाले आहेत. तर 147 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या काही रुग्णांची पालिकेकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच दिवसांचे विशेष आरोग्य शिबीर आयोजित केले जाणार आहे. या शिबीरात प्लाझ्मा दानासाठी सक्षम रुग्ण निवडण्यात येणार असून त्यांना प्लाझ्मा दानासाठी तयार करण्यात येणार आहे. त्यातून जे प्लाझ्मा उपलब्ध होतील त्यातून पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी वावरण्यात येणार आहेत.

प्लाझ्मा थेरपीने रुग्णाच्या आरोग्यात सुधारणा होत असल्याचे समोर आले. पालिकेच्या काही रुग्णालयांत प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्यानंतर गंभीर रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे येण्याचे आवाहन पालिकेसह राज्य सरकारने केलं. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन प्लाझ्मा उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

गेल्या काही दिवसांत मुंबईतील 831 प्रतिबंधित क्षेत्र 153 ने कमी करण्यात यश आले आहे. सील इमारतींची संख्या कमी करण्यावरही लक्ष केंद्रीत करणार आहोत. रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीए आणि महापालिका एकत्र येऊन समन्वयाने डॅश बोर्ड प्रणाली उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे रुग्णांना मोठी मदत मिळणार असल्याचे ही चहल यांनी सांगितले.

( संकलन - सुमित बागुल )

now plasma will be collected from cured covid patients from dharavi 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli: ''मी कुणाच्या बापाला भीत नाही, बंटी पाटलांसारखं वागायला लागलो तर...'' बंडखोरीवरुन डिवचणाऱ्याला विश्वजीत कदमांनी भरसभेत झापलं

'फक्त विग आणि मिशी घालून कुणी पृथ्वीराज होत नाही', मुकेश खन्नांनी उडवली अक्षय कुमारची खिल्ली

Stock Market: शेअर बाजारातील घसरणीत मोठा दिलासा! निफ्टी लवकरच करणार नवा विक्रम, पण कधी?

IND vs SA: कमी सामन्यांमध्ये सुसाट कामगिरी; Arshdeep Singh ने परदेशी मैदानावर घेतले सर्वाधिक ट्वेंटी-२० विकेट्स

Jayant Patil: " पोर्शे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहूयात", पाहा जयंत पाटलांनी काय केलं? Video Viral

SCROLL FOR NEXT