robot 
मुंबई

अरे वाह! आता 'तो' करणार कोरोना रुग्णांची सेवा; कल्याण-डोंबवलीच्या रुग्णालयांमध्ये घडणार 'असं' काही...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीतही कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून रुग्णालयात डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क आणि ग्लोव्हसोबतच पीपीई किटचाही वापर करावा लागतोय. मात्र तरीही कोरोना वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांना सतत औषध देणं, त्यांना जेवण देणं शक्य होत नाहीये. त्यामुळे आता KDMC नं यावर एक अनोखा उपाय शोधून काढला आहे. 

डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून KDMC नं एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. आता कोरोना वॉर्डमध्ये डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी नाहीत तर एक रोबोट रुग्णांची सेवा करताना बघायला मिळणार आहे. हा रोबोट कोरोना वॉर्डमध्ये रुग्णांना जेवण आणि औषध पुरवणार आहे. ज्यामुळे आरोग्य कर्मचारी कोरोनापासून स्वतःचा बचाव करू शकणार आहेत.  

प्रतीक तिरोडकर नावाच्या व्यक्तीनं हा रोबोट तयार केला आहे. कोरोना काळात आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून त्यानं हा रोबोट बनवला आहे. 

असा आहे हा रोबोट:

  • या रोबोटमध्ये सॅनेटाईझर आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
  • जेवण करण्याआधी किंवा पाणी पिण्याआधी हा रोबोट रुग्णांचे हात सॅनेटाईझ करणार आहे. 
  • या रोबोटमध्ये कॅमेरा आणि स्पीकर लावण्यात आला आहे.
  • काही अंतरावरूनही या रोबोटला ऑपरेट करता येणार आहे. 
  • बॅटरीवर चालणारा हा रोबोट एका वेळी तब्बल १५ रुग्णांना जेवण आणि पाणी पोहोचवू शकणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हा रोबोट आता कार्यरत असणार आहे. त्यामुळे आता आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष रुग्णाजवळ न जाता त्यांना जेवण आणि औषधं देता येणार आहेत.   

now robot will serve corona patients in KDMC read full story 
  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT