मुंबई

क्या बात हैं ! 'या' भारतीय शास्त्रज्ञाने शोधलीये कोरोनावरील लस!

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोना व्हायरस, एक असं नाव ज्याने सध्या जगभरात हाहाकार माजलाय. लीक झालेल्या माहितीच्या आधारे एकट्या चीनमध्ये तब्बल चोवीस हजार नागरिकांनी  या व्हायरसमुळे आपला जीव गमावलाय. (ही अधिकृत आकडेवारी नाही ). धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा आणखी संसर्ग रोखण्यासाठी चीनमध्ये कोरोना बाधित तब्बल २० हजार कोरोना बाधितांना मारण्यात येणार असल्याच्या बातम्या व्हायरल होतायत. अशात आशेचा किरण ठरतेय कोरोनावरील तयार होणारी लस. यातही आनंदाची बाब म्हणजे एका भारतीय संशोधकाने यावर अत्यंत महत्त्वाचं संशोधन केलंय आणि या महाभयंकर विषाणूंवर थोड्याच दिवसात लस तयार होईल असं म्हटलंय.   

जगभरातून या व्हायरसवर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञ रात्रीचा दिवस करतायत. अशात एक चांगली बातमी ऑस्ट्रेलियातून समोर येतेय. ऑस्ट्रेलियातील एका अनिवासी भारतीयाने कोरोनावर लस बनवण्यात जवळजवळ यश मिळवलंय. ऑस्ट्रेलियातील एका अत्यंत अद्ययावत आणि हाय-सेक्युरिटी प्रयोगशाळेत या लसीवर काम सुरु आहे. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशनची (CSIRO)  ही प्रयोगशाळा आहे. यामध्ये भारतीय शास्त्रज्ञाने कोरोनावर लस बनवण्यात जवळजवळ यश मिळवलंय. CSIRO चे पॅथोजन्स चमूचे प्रमुख प्राध्यापक एस. एस. वासन यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिलीये. 

गेल्याच आठवड्यात करोनाचा संसर्ग झालेल्या एका व्यक्तीकडून एक विषाणू आयसोलेट म्हणजेच वेगळा करण्यात ऑस्ट्रेलियाच्या डॉर्टी इंस्टिट्यूटच्या संशोधकांना यश आलेलं. अशात हा विषाणू आम्हाला दाखवण्यात आलाय. विषाणू खरा असेल तर यावर जलदगतीने काम केलं जाऊ शकतं. प्री-क्लिनिकल अभ्यास करून लस शोधली जाऊ शकते.  

दरम्यान प्री-क्लिनिकल अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात हे विषाणू उपलब्ध व्हायला हवेत असं देखील ते म्हणालेत. आम्ही प्रयोगशाळेत या विषाणूंची संख्या वाढवत असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र त्यांची नेमकी किती संख्या आहे हे वासन यांनी स्पष्ट केलेलं नाही.  मात्र वासन यांना आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या चमूला मिळेलेलं ये यश मोठं आहे. 

डॉक्टर आणि प्राध्यापक वासन यांनी  BITS पिलानी आणि IISc- बेंगळुरू मध्ये शिक्षण घेतलंय. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड मध्ये डॉक्टरेड पदवी घेतली. डॉक्टर आणि प्राध्यापक वासन यांनी झिकासारख्या महाभयंकर विषाणूंवर देखील काम केलंय. 

NRI dr wasn of CSIRO says we will soon find antidote for corona virus 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT