मुंबई : धारावीत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून धारावीत गेल्या 24 तासांत एकाचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 57 वर पोहोचला आहे. तर 53 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीतील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,478 वर पोहोचली असून आतापर्यंत 57 जणांचा मृत्यू झाला आहे.
हे ही वाचा : सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...
मुस्लिम नगर, माटुंगा लेबर कॅम्प, इंदिरा नगर, लक्ष्मी चाळ, जनता सोसायटी, सर्वोदय सोसायटी, सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला, कुंची कुरवे नगर, या परिसरात आतापर्यंत कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे हाॅटस्पाॅट ठरलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,478 वर पोहोचली असून त्यापैकी 57 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, दादर मध्ये आज 13 नवे कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या 205 झाली आहे. तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर माहीममध्ये कोरोनाचे आज 23 नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 286 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
number of corona positive in dharavi is near to one thousand five handred
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.