ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, शनिवारी 1 हजार 822 नवीन रुग्णांसह 43 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 65 हजार 927 इतका झाला आहे. तर एक हजार 870 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
मोठी बातमी : दुर्घटनाग्रस्त भानुशाली इमारतीबद्दल मोठा खुलासा, परवानगी देऊनही इमारतीची दुरुस्ती वर्षभर का रखडली?
जिल्ह्यात शनिवारी कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात 475 नवीन रुग्णांची तर, 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. तर ठाणे पालिका हद्दीत 342 रुग्ण, 10 जणांचा मृत्यू; नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 352 नवे रुग्ण, 10 मृत्यू; मीरा भाईंदरमध्ये 168 रुग्ण, 4 मृत्यू; भिवंडी महापालिका क्षेत्रात 57 बधीत, 2 मृत्यू; उल्हासनगर 148 रुग्ण तर, 3 मृत्यू; अंबरनाथमध्ये 64 रुग्णांसह 4 जणांचा मृत्यू; बदलापूरमध्ये 66 रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, ठाणे ग्रामीण भागात 150 रुग्णांसह, 1 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांची संख्या 4 हजार 27 तर, मृतांची संख्या 107 वर गेली आहे.
महापालिका क्षेत्र - रुग्ण संख्या - मृत
ठाणे - 342 - 10
कल्याण डोंबिवली - 475 - 09
नवी मुंबई - 352 - 10
मीरा भाईंदर - 168 - 04
भिवंडी - 57 - 02
उल्हासनगर - 148 - 03
अंबरनाथ - 64 - 04
बदलापूर - 66 - 00
ठाणे ग्रामीण - 150 - 01
(संपादन : वैभव गाटे)
the number of corona positive in thane district is near 66 thousand
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.