मुंबई

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, दिवसभरात 1,063 नवे रुग्ण

मिलिंद तांबे

मुंबई: कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यात मुंबईत शनिवारी 1,063 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 2,81,874 झाली आहे. तर काल 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,773 वर पोहोचला आहे. काल दिवसभरात 880 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,55,345 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 91 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 196 दिवस इतका आहे. तर 27 नोव्हेंबरपर्यंत एकूण 18,71,125 कोविड चाचण्या करण्यात आल्या.  21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.35 इतका आहे.

मुंबईत शनिवारी नोंद झालेल्या 17 मृत्यूंपैकी 12 जणांना दीर्घकालीन आजार होते. शनिवारच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 14 पुरुष तर 3 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी 6 जणांचे वय हे 40 ते 60 वर्षादरम्यान होते तर 11 रुग्णांचे वय 60 वर्षावर होते.

मुंबईत 429 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 5,077 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 6,572 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल करण्यात येणाऱ्यांची संख्या देखील वाढत असून शनिवारी कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 481 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले.

राज्यात 5,965 नवे रूग्ण

शनिवारी राज्यात 5,965 रूग्णांचे निदान झाले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 18,14,515 इतकी झाली आहे. काल राज्यात 75 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 2.59 इतका झाला आहे. राज्यात काल रोजी एकूण 89,905 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

राज्यात शनिवारी दिवसभरात 3,937 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 16,76,564 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दर 92.4 टक्के इतका आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात नवीन निदान झालेल्या रुग्णांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढली असून ऍक्टीव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे.  राज्यात दिवसभरात 75 मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा 46,986 वर पोहोचला आहे. 

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Number of corona viruses Mumbai increases 1 thousand 63 new patients admitted in day

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT