मुंबई: गेल्या वर्षभरापासून मुंबई आणि परिसरातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय बंद असल्याने त्याचा फटका दहावी-बारावीच्या परीक्षा नोंदणीला बसला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी ही नोंदणी घटली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे तर बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी मुंबई विभागीय मंडळाकडून मागील वर्षाच्या तुलनेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्यावर्षी बारावीच्या 3 लाख 14 हजार 449 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा मात्र 2 लाख 92 हजार 768 विद्यार्थ्यांनीच परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे.
मुंबई विभागीय मंडळात आतापर्यंत दहावीसाठी 3 लाख 59 हजार तर बारावीसाठी 2 लाख 92 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. बारावीला गेल्या वर्षी 3 लाख 14 हजार 449 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीसाठी 20 हजार 165 पूर्नपरिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
अशी आहेत संख्या घटल्याची कारणे
दहावीच्या विद्यार्थी संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी झाले असून वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणासाठी तसेच परदेशी शिक्षणासाठी आवश्यक असलेले गुण मिळवण्यासाठीचा प्रयत्न व्हावा म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी यंदा या परीक्षेला गॅप टाकला असल्याचे बोलले जात आहे. तर कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम अर्धवट राहिला असल्याने काही विद्यार्थ्यानी असा निर्णय घेतला असावा असे बोलले जात आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
दहावीच्या नोंदणीत यंदा वाढ
दहावीला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढ झाली आहे. गेल्यावर्षी 3 लाख 32 हजार 746 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 31 हजार 136 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यावर्षी 3 लाख 59 हजार 808 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर पूर्नपरिक्षार्थी 16 हजार 308 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Number of students registering Class 12th examination Mumbai Decrease
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.