जायफळाचे फळ  
मुंबई

जायफळाचा सुगंध हरवतोय

अभय आपटे

अलिबाग : वाढत्या उष्म्याचा फटका चौल-रेवदंडा परिसरातील जायफळाच्या पिकाला बसला आहे. त्यामुळे यंदा या फळाचा हंगाम लवकरच आटोपला असून तब्बल 30 टक्के कमी उत्पादन निघाले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास हे पीक या परिसरातून नामशेष होण्याची भीती बागायतदार व्यक्त करीत आहेत. 

अलिबाग तालुक्‍यातील चौल-रेवदंडा ही दोन गावे जायफळाचे उत्पादन घेण्यात आघाडीवर आहेत. तालुक्‍यातील अन्य किनारी गावे आणि मुरूड-श्रीवर्धन तालुक्‍यातही हे पीक घेण्यात येते. बागायतदार आंतरपीक म्हणून हे सुमारे चारशे वर्षांपासून या भागात घेण्यात येते. पूर्वी त्याला फारसा भाव नव्हता. त्यामुळे दुर्लक्ष झाले होते. परंतु आता अनेक बागायतदार त्याकडे वळले आहेत. 

चौल, रेवदंड्यातील वाळूयुक्त माती आणि नारळ-पोफळीच्या सावलीखाली हे वृक्ष वाढतात. गाळीव सूर्यप्रकाश, बारमाही विपुल पाणी त्यास उपयुक्त ठरत आहे. 

जायफळाचे दहा वर्षांवरील एक झाड दरवर्षी सुमारे 150 ते 175 फळे देते. जुने झाड अधिक फळे देते. 


पिकास रोगराईचा विशेष त्रास नसला, तरी कोकीळ पक्षी त्यचा मुख्य शत्रू आहे. त्यांना या फळावरील जायपत्री फार आवडते. पक्व फळ फुटून जायपत्री दिसू लागताच कोकीळ तेथे हजर होऊन ती पळवतात. 

गेल्या दोन वर्षांपासून ही झाडे सुकली आहेत. तीव्र उष्म्याचा त्यांना फटका बसला आहे. त्याचा परिणाम पिकावर झाला आहे. चौल-शितळादेवी परिसरातील बागायतदार सुशील राऊत यांनी सांगितले की, उत्पन्न घटले असून फळांचा आकारही लहान झाला आहे. 

गतवर्षी दापोली कृषी विघापीठातील तज्ज्ञ या पिकाची पाहणी करून गेले आहेत. परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही, असे बागायतदारांनी सांगितले. या वेळी ऑगस्टच्या सुरुवातीचा हंगाम संपला आहे. काही झाडांना पानगळती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. या वर्षी 30 टक्के उत्पादन घटले आहे, असेही त्यांनी सांगितले. 
ही फळे वाशी बाजारात किलोच्या दराने विकण्यात येतात. प्रति किलो 350 रुपये भाव मिळतो. व्यापारी चौलमधून 150 ते 250 रुपये शेकडा भावाने खरेदी करतात. प्रतवारीप्रमाणे दर ठरतो. 

असा आहे उपयोग 
जायफळाच्या बियांचा मगज सुगंधासाठी वापरतात. श्रीखंड, पेढे, बर्फी, हलवा, बासुंदीमध्ये त्यांचा वापर होतो. त्यामुळे पचन चांगले होते. मेजवानीच्या तिखट मसाल्याच्या पदार्थात जायफळ व जायपत्री हमखास वापरतात. औषधी गुणधर्म असल्याने पूर्वी आजीबाईच्या बटव्यात त्याला स्थान होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT