Occasional overcrowding in women compartment due to holidays or work from home mumbai local  Sakal
मुंबई

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर फलाटाच्या कामासाठी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरु आहे. पायाभूत सुविधा उभारणीच्या रेल्वेच्या महत्त्वाच्या कामाला महिला प्रवाशांची साथ लाभल्याचे चित्र होते. अनेक आस्थापनांनी महिलांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला तर काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन दिली. त्यामुळे शनिवारी प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या तुरळक होती.

मध्ये रेल्वेने शुक्रवारपासून घेतलेल्या मेगाब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते भायखळा तसेच सीएसएमटी ते वडाळा स्थानकापर्यत लोकल सेवा ठप्प होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने शासकीय आणि खासगी आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा वर्क फॉर्म होमचा पर्याय देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यामुळे गर्दी आटोक्यात आल्याचे चित्र होते.

दक्षिण मुंबईतील कंपन्यांनी महिला कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा सुट्टी जाहिर केली.अनेक महिला कर्मचाऱ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी सुट्टी घेणे पंसत केले.त्यामुळे ऐरवी दिसणारी महिला डब्यातील गर्दी शनिवारी एकदम कमी होती. अनेक महिला डबे रिकामे धावत असल्याचे चित्र दिसून आले.

-फलाट उभारणी व पायाभूत सुविधा उभारणीच्या कामामुळे मुंबईकराचा प्रवास आणखी गतिमान होणार आहे. त्यामुळे मी स्वतःहून शनिवारी सुट्टी घेतली आहे. पर्यायी दिवशी माझी रजा भरून काढणार आहे. त्याला आस्थापनाने मजुरी दिली आहे.

- स्मिता शेलार, महिला प्रवासी ठाणे

दादर स्थानकांवर वेणी व्यवसाय करते. रेल्वेच्या ब्लॉकमुळे मी शनिवार आणि रविवार दादरला जाणार नाही. माझ्या बरोबर काम करणाऱ्या महिलांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

- यशवंती झालटे, वेणी व्यावसायिक

ब्लॉकमुळे आम्हाला आमच्या कंपनीने शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच शनिवारचा दिवसभरून काढण्यासाठी आम्हाला अन्य दिवस ओव्हर टाईम करावे लागणार आहे.

- सायली वाकचोरे,कर्मचारी,

- आमच्या आस्थापनाने महिला वर्गासाठी शुक्रवारी संध्याकळी विशेष बसेसची सोय करून दिली होती. शनिवारी वर्क फॉर्म होम दिले आहे.

स्मिता माळी,आयटी कर्मचारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT