मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांचा (corona patients) आलेख झपाट्याने वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांनीही (health experts) तिसर्या लाटेची (corona third wave) सुरुवात असे वर्णन केले आहे, तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी ओमिक्रॉनमुळे (omicron variant) तिसरी लाट येऊ शकते असे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत ओमिक्रॉनचा सामूहिक संसर्ग (omicron community transmission) आहे की नाही? हे शोधण्याचा पालिका (BMC) प्रयत्न करत असून यासाठी पालिका ज्या भागात जास्त कोरोना रुग्ण आढळत आहेत त्या भागात कोविडबाधित नमुन्यांचे जीनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) करत आहे. (omicron community transmission possibilities whereas genome sequencing tests reports declares on Thursday)
त्याचा अहवाल गुरुवारपर्यंत पालिकेला मिळेल असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. पालिकेने 21 डिसेंबरपासून मुंबईत आढळणाऱ्या प्रत्येक कोविड बाधिताचा नमुना जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला आहे. 21 ते 23 डिसेंबर या तीन दिवसांतील 375 नमुन्यांचे जिनोम सिक्वेसिंग केले जात आहे याचा अहवाल गुरुवारपर्यंत पालिकेला प्राप्त होईल. यासह आणखीही नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी घेतले जाणार आहेत असेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. यावरून ओमिक्रॉनचा प्रसार किती झाला आहे हे स्पष्ट होईल.
ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. याअंतर्गत पालिकेने मेट्रो सिटी मुंबईमध्ये कम्युनिटी सर्विलांस सुरू केले आहे. कम्युनिटी सर्विलांसद्वारे, शहरांमध्ये कोविडने ग्रस्त असलेल्या कोणत्याही रुग्णाचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जात आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, जे नवीन रुग्ण सापडत आहेत ते कोणत्या व्हेरिअंटने ग्रस्त आहेत.
आतापर्यंत मुंबईत परदेशातून आलेल्या कोविड बाधितांचे नमुने आणि मुंबईतील गंभीर कोविड रुग्णांचे नमुने आणि हॉट स्पॉट्समधून पॉझिटिव्ह आढळलेल्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. पण, आता कोरोना हॉटस्पॉट परिसरात आढळलेल्या कोविड बाधितांचे नमुनेही पाठवले जात आहेत.
काकाणी म्हणाले की, सातवा जीनोम सिक्वेन्सिंग अहवाल गुरुवार ते शुक्रवार दरम्यान येईल. सध्या कोरोना विषाणूचे दोन प्रकार आहेत, एक डेल्टा आणि दुसरा ओमिक्रोन. रोगाचा नमुना दोघांसाठी वेगळा आहे. डेल्टा अधिक प्राणघातक आहे. ओमिक्रॉनची प्रसार तीव्रता जास्त असल्याने, दोन जातींमध्ये फरक करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील रणनीती तयार करण्यास मदत होईल.
मुंबईची क्षमता 384
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत असलेल्या मशिनमध्ये एकाच वेळी 384 नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करता येते. अशा परिस्थितीत बाधितांची संख्या जास्त असल्यास त्यांचे नमुने अन्य प्रयोगशाळेत पाठवले जातील, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.