मुंबई : कोविडच्या दैनंदिन रुग्णांची संख्या (corona patients) आज 10 हजारांवर पोहचली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्या पासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊनची (Lockdown) चर्चा सुरु झाली आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर (Mayor kishori pednekar) यांनी भुमिका स्पष्ठ केली आहे. लॉकडाऊन लागावे अशी कोणाचीही अपेक्षा आणि भावना नाही. मात्र, रोजची रुग्णसंख्या 20 हजारा पर्यंत पोहचल्यास केंद्र आणि राज्य सरकारने (Maharashtra Government) सांगितले तर लॉकडाऊन लावावे लागेल. असे महापौरांनी स्पष्ट केले. चित्रपट गृह, उद्याने, बाजारपेठांमध्ये गर्दी होत राहील्यास मनी लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असेही महापौरांनी नमुद केले. (If corona patients reaches twenty thousand number mini lockdown possibilities says mayor kishori pednekar)
मुंबईसह राज्यात पुन्हा कोविड बाधीतांची संख्या वाढू लागली आहे.मुंबई ओमिक्रॉनच्या सावटाखाली अाहे.त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ही नागरीकांशी संवाद सांधण्याची शक्यता आहे. महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी रुग्णसंख्या 20 हजार पर्यंत पोहचल्यास लॉकडाऊन लावावे लागेल असे स्पष्ट केले होते.त्यानंतर आज महापौरांनीही लॉकडाऊन बाबत भुमिका स्पष्ट केली आहे.विवाह समारंभ,सार्वजनिक कार्यक्रम सरकारने ठरवून दिलेल्या नियमातच झाली पाहिजे.सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरण्यासह सर्व नियमांचे पालन करायला हवे.असेही महापौरांनी नमुद केले.
बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.तेथे नियमही पाळले जात नाही.त्यावरुनही महापाैरांनी नाराजी व्यक्त केली.चित्रपट गृहे,उद्याने आणि बाजारपेठां मध्ये गर्दी होत राहील्यास मुंबईत मिनी लॉकडाऊन केला जाऊ शकतो असे संकेत महापौरांनी दिली.
नागरिकांनी स्वैर वागू नये
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आपल्याला लॉकडाऊन परवडणार नाही असे नेहमीच सांगत आहेत.पण,मुंबईकर स्वैर वागत आहेत.कोरोना रुग्णसंख्या चार पटीने वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचे पालन करायला हवे.ओमिक्रॉन घातक नाही.पण,नियमांचे पालन सर्वांनी करायला हवे.असेही महापौरांनी नमुद केले.
आठवड्यातील रुग्णवाढ
दिवस - नवे रुग्ण
-29 डिसेंबर - 2510
30 डिसेंबर - 3671
-31 डिसेंबर -5631
-1 जानेवारी - 6347
-2 जानेवारी - 8063
-3 जानेवारी - 8082
-4 जोनवारी-10,860
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.