मुंबई : ओमिक्रॉन व्हेरियंट (Omicron variant) अखेर भारतात धडकलाय. त्यामुळे राज्य सरकारही (Maharashtra Government) आता सतर्क झाले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट किती घातक आहे ? त्यावर कोविड प्रतिबंधक (corona vaccine) लस कितपत प्रभावी आहे यावर आता जगभरातील लसनिर्मिती कंपन्यांकडून परीक्षण सुरु आहे. त्यामुळे याचा महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता कोविड टास्क फोर्सने (corona task force) ही राज्य सरकारला बऱ्याचशा सूचना केल्या आहेत. ओमिक्रॉन हा झपाट्याने पसरणारा स्ट्रेन (Fastest spreading virus) असून आपली सुरक्षा आपल्याच हाती असे म्हणत ओमिक्रॉनसाठी डबल मास्किंग गरजेचे असल्याचे मत कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी (Dr shashank joshi) यांनी मांडले आहे.
आतापर्यंत जगभरात डेल्टा स्ट्रेन अग्रेसर होता. तेव्हा तो झपाट्याने वाढला. पण, डेल्टा पेक्षाही झपाट्याने पसरण्याची शक्यता ओमिक्रॉनमध्ये वर्तवण्यात आली आहे. सुरुवातीला कोणत्याही व्हायरसची सुरुवात होते तेव्हा आधी सौम्य लक्षणे पाहिली जातात. तर, भारतात जे दोन्ही रुग्ण आढळले आहेत त्यांचे अनेक संपर्कातील नागरिकांचे रिपोर्ट निगेटीव्ही आले आहेत. दोघांचे जिनोम सिक्वेसिंग रिपोर्ट अजूनही आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेत आता सौम्य ते गंभीर असे रुग्ण वाढायला लागले आहेत. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढले आहे पण आयसीयूतील रुग्ण वाढलेले नाहीत.
यावरुन ऑक्सिजनचा वापर वाढला आहे, बेड्स पुन्हा भरले आहेत, आयसीयू रुग्णांमध्ये वाढ नाही. ही एक दिलासादायक बाब आहे. पुढच्या 3 ते 6 आठवड्यात याचं नेमके चित्र स्पष्ट होईल असेही डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या भारतात किंवा मुंबईत येणारा जो व्हायरस आहे तो कुणीतरी घेऊन आलेला व्हायरस असेल. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय विमानतळावरच जास्तीचे निर्बंध लादले पाहिजे असा सल्ला राज्य आणि केंद्र सरकारला देण्यात आला आहे.
काय काळजी घ्याल ?
लसीकरणामुळे जीव वाचतो, तीव्र आजाराची शक्यता कमी होते, लसीकरणामुळे कोविड होत नाही असं नाही. पण, भारतातील कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी ओमिक्रॉनवर प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, लवकरात लवकर लसीकरण होणे गरजेचे आहे. शिवाय, लसीकरणाचा दुसरा डोस घेणे महत्त्वाचे आहे. आणि ज्यांनी अजिबातच डोस घेतलेला नाही त्यांनीही लवकरात लवकर लस घेतली पाहिजे असे आवाहन डॉ. जोशी यांनी केले आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये लोकांनी डोस घेतले नाहीत तिथे वेगाने लसीकरण झाले पाहिजे. ब्रेक थ्रू संसर्गाचे प्रमाणही कमी आहे.
डबल मास्किंग करणे गरजेचे
हल्ली नागरिक मास्कचा वापर कमी करतात. ओमिक्रॉन किंवा डेल्टा असो हा हवेतून पसरणारा व्हायरस आहे. त्यामुळे डबल मास्किंग करणे महत्त्वाचे आहे. कापडाच्या मास्कमुळे व्हायरसचा संसर्ग कमी होत नाही. त्यामुळे, नागरिकांनी किमान 3 प्लाय मास्क किंवा एन 95 मास्क लावला पाहिजे. डबल मास्किंग, डबल लसीकरण हे सूत्र पाळायला पाहिजे.
ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग म्हणजे आपल्याला पुन्हा मुलभूत गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल, असे कोविड-19 राज्य सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले. आरोग्य अधिकार्यांना रूग्णांचे सखोल संपर्क ट्रेसिंग, चाचणी आणि उपचार करावे लागतील. प्रत्येक संशयितामागे जवळपास 200 संपर्कांची - प्राथमिक, दुसरी आणि तिसरी चाचणी केली जात आहे. देशातील पहिली केस नुकतीच सापडली आहे आणि तिथे बरीच दक्षता आणि चाचण्या केल्या जात आहे. या प्रकाराचा व्यापक प्रसार होण्यासाठी एक किंवा दोन महिने लागू शकतात, असेही डॉ. पंडित यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.