on thursday water supply of kalyan dombivli cut off due to maintenance work Sakal
मुंबई

Water Supply Kalyan-Dombivli : गुरुवारी कल्याण डोंबिवली मधील पाणी पुरवठा बंद

टाटा पॉवर कांबा सबस्टेशन मधील एनआरसी 2 फीडरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम तसेच बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - टाटा पॉवर कांबा सबस्टेशन मधील एनआरसी 2 फीडरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम तसेच बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामानिमित्त येत्या गुरुवारी 2 मे ला कल्याण डोंबिवली मधील पाणी पुरवठा 9 तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या 150 द.ल.ली. मोहिली उदंचन केंद्र (नेतिवली जल शुद्धीकरण केंद्र) व 100 द.ल.ली. मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत टाटा पॉवर कांवा सबस्टेशन येथुन एनआरसी 2 फीडरद्वारे विद्युत पुरवठा केला जातो. टाटा पॉवर कंपनीने टाटा पॉवर कांबा सबस्टेशनमधील एनआरसी 2 फीडरच्या देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी केले जाणार आहे.

या कामासाठी 2 मे ला शट डाऊन घेण्यात येणार आहे. तसेच सदर दिवशी बारावे जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत (9 तास) महापालिकेच्या बारावे,

मोहिली, व नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व व पश्चिम, कल्याण ग्रामिण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंविवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) व डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरास होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: कोल्हापूरमध्ये क्षीरसागर-पाटील समर्थकांत बाचाबाची

Sharad Pawar: हाय होल्टेज ड्रामा! मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या नेत्याला जबर मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Shrinivas Pawar: "भाऊ अन् मुलगा यांच्यामध्ये मी शरद पवारांच्या बाजूने..."; श्रीनिवास पवारांचं मत, दादांना धक्का बसणार?

विकासाचे मारेकरी कोण अन् वारकरी कोण? मतदानाच्या दिवशी सूचक ट्विट; 'भाईं'नी चेंडू जनतेकडे पाठवला, काय म्हणाले?

व्हा सज्ज! Lionel Messi १४ वर्षांनंतर पुन्हा भारतात येतोय, अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा दौरा

SCROLL FOR NEXT