मुंबई

धक्कादायक ! बिल्डिंग मधील २५ जणांसोबत ज्यांच्या खांद्यावर कोरोना पळविण्याची जबाबदारी त्याही कोरोना पॉझिटिव्ह...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी राज्यसरकारने नेमलेल्या कोविड टास्क फोर्समधील महिला आयएएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ही अधिकारी राहत असलेल्या इमारतीमधील काम करत असलेले 25 कर्मचारी कोरोनाग्रस्त आढळून आल्याने सरकारी कर्मचारी धास्तावले आहेत.

राज्य सरकारने लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र कोविड-19 वर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या टास्क फोर्समधील महिला आयएएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील रुग्णालय विशेषतः कोरोनाच्या उपाययोजनांची महत्त्वाची जबाबदारी या अधिकाऱ्यावर आहे, परंतु त्यांनाही कोविड-19 ची लागण झाली आहे.

दरम्यान आतापर्यंत राज्य सरकारमधील दोन मंत्री आणि प्रशासनातील तीन अधिकारी कोरोनाग्रस्त झाले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केली आहे. तर तीनपैकी दोन अधिकारीही कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या आयएएस अधिकाऱ्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

याआधी राज्यात दोन आयएएस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले  होते. त्यातील एक महिला अधिकारी मजुरांच्या व्यवस्था पाहणाऱ्या टास्क फोर्समध्ये काम करत होत्या. त्यानंतर ऊर्जा खात्यातील आयएएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरी घरकाम करणारा स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आला होता. हे अधिकारी मंत्रालयाजवळच असलेल्या यशोधन इमारतीत राहतात.

घरातील स्टाफ कोरोनाग्रस्त झाल्यावर इमारतीतील सगळ्यांच्या चाचण्या झाल्या. ज्या स्टाफची कोरोना चाचण्या करण्यात आली त्यात या इमारतीत घरकाम करणारे, स्वयंपाक करणारे, वाहनचालक असे 25 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता या इमारतीमधील महिला आयएएस अधिकारी आणि स्टाफ असे अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

one more IAS officer form mumbai covid task force detected positive


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT