मुंबई

'त्या' नायजेरियन डिलरने ट्रेनची चेन ओढली आणि तिथेच फसला, RPF पोलिसांनी तपासली बॅग आणि खेळ खल्लास

सकाळवृत्तसेवा

मुंबई : दिल्ली ते एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस विशेष गाडीने मादक द्रव घेऊन प्रवास करणाऱ्या नायजेरीयन माणसाला मुंबई आरपीएने अटक केली आहे. नॉयडा येथून मादक द्रव आणून मुंबईत विकण्याचा त्याचा बेत होता. पनवेल आधीच निळजे आणि तळोजा दरम्यान त्यांनी गाडीची चेन खेचून गाडीतून उतरण्याच्या प्रयत्न.  गाडीतून उतरताना आरपीएफ पोलिसानं  त्याला पाहिलं आणि त्याच्यी झडती घेतली. बॅगची झाडाझडती घेतल्यानंतर त्यामध्ये संशयास्पद पावडर आढळून आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. अधिक चौकशीत त्याच्याकडे सुमारे दोन कोटींचे मादक द्रव आढळून आले आहेत.  

नवी दिल्लीतील नॉयडा येथून मादक द्रव घेऊन प्रवास करणाऱ्या नायजेरीयन नागरिकाला मुंबई आरपीएफ पोलिसांनी तात्काळ अटक केली. निळजे ते तळोजा दरम्यान त्याने एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस फलाटावर जाण्यापुर्वीच चेन घेचून गाडी रोखली होती. दरम्यान रेल्वे स्थानकावर तैनात आरपीएफ पोलिसांना ही बाब लक्षात आली. दरम्यान त्याला अटक केल्यानंतर बँगची झाडाझडती घेतली त्यामध्ये पांढऱ्या पावडर सारखे पदार्थ आढळून आले होते.

सदर नायजेरियन व्यक्तीकडे असणारी पावडर नारकोटीक कंन्ट्रोल ब्युरो (एनसीबी)ने तपासल्यानंतर हे ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीकडे असणारी पावडर  म्हणजे सुमारे 2.3 किलो वजनाचे अ‍ॅम्फॅटामाइन्स नावाचं मादक द्रव्य असल्याचे आढळून आले. या ड्रग्जची बाजारातील किंमत सुमारे  2 कोटी असल्याचा अंदाज आहे. नारकोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्ससेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत आरोपी आणि जप्त केलेले ड्रग्स एनसीबी अधिका-यांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के के अशरफ यांनी सांगितले आहे.

one Nigerian man arrested by mumbai police for caring white powder worth 2 core

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT