Toll plaza sakal
मुंबई

मुंबईच्या मासिक टोल पासधारकांना ऑनलाईन पासची सोय!

एमएसआरडीसीचा मोठा दिलासा

प्रशांत कांबळे

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई प्रवेशद्वारावरील पाच पथकर नाक्यावर प्रत्यक्ष न जाता ऑनलाईन पध्दतीने मासिक टोल पास खरेदी व त्याचवेळी ऑनलाईन कार्यान्वित करण्याची पध्दत सुरु केली आहे. मुंबई प्रवेश द्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड, मुलुंड (एलबीएस) व दहिसर या पथकर नाक्यावरुन मासिक टोल पास (Monthly Toll Pass) घेऊन प्रवास करणाऱ्या वाहन धारकांच्या सोयीसाठी फास्टॅगमध्येच (Fast tag) मासिक पासची सुविधा यापूर्वीच महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे. (Online toll pass Facility for monthly cardholders by MSRDC)

आता वाहनधारकांना घर बसल्या ऑनलाईन पध्दतीने बँकेच्या माध्यमातून पैसे जमा करुन एका टोल नाक्याचा अथवा सर्व टोल नाक्याचा फास्टॅगमध्ये खरेदी व त्याचवेळी ऑनलाईन कार्यान्वित करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असून प्रचलित पध्दतीप्रमाणे 3 दिवसात टोल नाक्यावर जावून पास कार्यान्वित करणेची अट देखील रद्द केली आहे. याशिवाय वाहनाच्या समोरील काचेवर टोल नाक्याच्या कंत्राटदाराचे कलर स्टीकर लावण्याची अट देखील रद्द केली असल्याचे एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली.

या सुविधेचा फायदा मुंबई मधील सुमारे 25 हजार वाहनधारकांना होईल. पथकर नाक्यावर मासिक पास घेतेवेळी होणाऱ्या गर्दीमुळे कोवीडचा संसर्ग होवू नये त्यासाठी या सुविधेचा जास्तीत जास्त वाहन धारकांनी फायदा घ्यावा, तर मुंबई पथकर नाक्यांवरील गर्दीच्या वेळची वाहतूक कोंडी कमी करुन विना थांबा प्रवास सुविधा देणेसाठी महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून मुंबई मधील वाहनाधारकांनी फास्टॅग वापरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला असून दिवसेंदिवस फास्टॅग वाहनांची संख्या वाढत आहे. मुंबई पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होत असल्याचे पथकर प्रशासन विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फ़ंड यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT