Mumbai News 
मुंबई

Mumbai : शहरात पोलिसांकडून ऑपरेशन 'ऑल आऊट' कार्यान्वित; 5 हजार वाहनचालकांवर कारवाई

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई शहरात 24 जून ते 25 जून दरम्यान 'ऑपरेशन ऑल आऊट' हे विशेष अभियान मुंबई पोलीसांकडून राबविण्यात आले. मुंबई शहरातील सर्व 5 हि प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त तसेच14 परिमंडळीय पोलीस उप आयुक्त, 28 विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व अधिकाऱ्यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात ऑल आऊट मोहिमेत कार्यवाही केली.

24 तास राबवण्यात आलेल्या मोहिमेत 215 कोंबिग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात 236आरोपीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. तसेच अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार 28 आरोपींना अटक करण्यात आली. या व्यतिरिक्त 105 ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली त्यात 5000 हून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली

अभियाना दरम्यान केलेली कारवाई

• मुंबई शहरात एकुण 215 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले, त्यामध्ये अभिलेखावरील 955 आरोपी (रेकॉर्डवरील ) तपासण्यात आले. त्यामध्ये 236 आरोपीवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे.

• पोलीस ठाणे अभिलेखावरील अमली पदार्थ संबंधित गुन्हयातील 394 आरोपी तपासण्यात आले. तसेच अंमलीपदार्थ खरेदी / विक्री करणाऱ्या इसमांवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा अन्वये एकुण 19 गुन्हे दाखल करून 28 आरोपी अटक करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एकूण 83 इसमांवर कारवाई करण्यात आली.

• जबरी चोरी गुन्हयातील अभिलेखावरील 323 आरोपी तपासण्यात आले. तडीपार केलेले आरोपी तपासण्यात आले असून एकूण 48 आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

• बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने हॉटेल, लॉजेस्, मुसाफिरखाने असे एकूण 609 आस्थापना तपासण्यात आल्या, तसेच मुंबईतील संवेदनशील असलेल्या 507 ठिकाणांची तपासणी करण्यात आली.

• एकुण 77 अजामीनपात्र वॉरंट व एकूण 5 स्थायी वॉरंटची अमलबजावणी करण्यात आली.

● अवैध शस्त्र बाळगणाऱ्या प्रकरणी एकुण 26 गुन्हे दाखल करण्यात आले व 28 आरोपींना अटक करण्यात आली.

• अवैध धंद्यांवर एकूण 34 ठिकाणी छापे टाकून सदरचे अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले.

• सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एकुण 105 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. यादरम्यान 5927 दुचाकी / चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच मोटार वाहन कायद्यान्वये 1995 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकींनी कसा मिटवला शाहरुख-सलमानमधील वाद, 'त्या' पार्टीत नेमकं काय घडलं होतं?

भाजपकडून सोलापुरातील ‘या’ विधानसभा मतदारसंघांचा गुप्त सर्व्हे! उमेदवार बदलाची पदाधिकाऱ्यांची मागणी; निवडणुकीपूर्वी नाराजी दूर करण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न

Baba Siddique Political Career: बिहार जन्मभूमी तर मुंबई कर्मभूमी; राजकारणासह सिनेसृष्टीत बाबा सिद्दीकींनी कसा निर्माण केला दबदबा?

Ranji Trophy 2024: अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर अपयशी; गत विजेत्या मुंबईला पहिल्या डावात पिछाडी

Team India: शुभमनच्या नेतृत्वाखाली सिनीयर्स कसे खेळणार? BCCI ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहितचा पर्याय दिला, आता प्रश्नच मिटला

SCROLL FOR NEXT