मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेच्या महाविकास आघाडी सरकारला आज एक वर्ष पूर्ण होतंय. यानिमित्ताने महाराष्ट्र भाजपकडून पुढील तीन दिवसात राज्यभरात पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या एक वर्षांच्या कामगिरीवर भाष्य केलं जाणार आहे. याची सुरवात आज मुंबईतून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतून झाली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी 'ही कसली वचनपूर्ती' पुस्तिकेचे प्रकाशन देशील केलं.
या पत्रकार परिषदेची सुरवात करताना देवेंद्र फडणवीसांनी कंगना प्रकरणात आणि अर्णब गोस्वामी प्रकरणात दिलेल्या निकालांवरून महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले. कंगना प्रकरण आणि अर्णब गोस्वामी प्रकरणातील कारवाई म्हणजे 'अब्युज ऑफ पावर' आणि 'कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी ब्रेकडाऊन'चं उत्तम उदाहरण असल्याचं फडणवीस म्हणालेत. मात्र आम्ही राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी कारण नाही असं फडणवीस म्हणालेत.
आपल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी अनेक मुद्दे मांडले. जाणून घेऊनयात फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :
- कंगना आणि अर्णब प्रकरणात आता आमची मागणी आहे की, कोर्टाकडून हे निकाल आल्यांनतर सरकार कुणावर कारवाई करणार, हे सरकारने स्पष्ट करावे. मुख्यमंत्री याबाबत माफी मागणार, गृहमंत्र्यावर कारवाई करणार, की नियमांच्या बाहेर जाऊन कारवाई केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार? हे सरकारने सांगावे.
- या वर्षात सरकारची काहीच अचिव्हमेंट नाही, मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली, ही वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुलाखत असल्याने आम्हाला अपेक्षित होतं. यामध्ये महाराष्ट्रात काय अडचणी होत्या, कसा विकास करणार, राज्यातील महिला, शहरे, ग्रामीण भाग याबद्दल आमचं व्हिजन काय या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत दिशा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र मुलाखतीतून केवळ टीका टिप्पणी करण्यात आली.
- महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री आजवर पहिले नव्हते. मुख्यमंत्री हे संयमी आहेत, हे मी ऐकलं होतं आणि अनुभवलं होतं. मात्र, दसरा भाषण आणि कालची मुलाखत त्यांना शोभणारी नाही. कुणाच्याही विरोधात राग आणि द्वेषाशिवाय मी कारवाई करीन हा संविधानाचा एक भाग आहे. त्याचं पालन करताना मुख्यमंत्री दिसत नाही
- हात धूऊन मागे लागू, खिचडी करू, खिमा करू ही वक्तव्ये शोभत नाहीत. अशी भांडणे नाक्यावर होतात. अशी टीका ज्यांनी केली ते टिकले नाहीत. बरं झालं त्यांची मुलाखत एक दिवस आधी झाली नाहीतर कोर्टाचा अवमान झाला असता.
- मी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर बोलणार नाही, कारण तशी त्या मुलाखतीची लायकी नाही
- तुम्ही पाच वर्ष काम करा, पुढील पाच वर्ष काम करा. पाच वर्षात धमक्या देऊ नका, गव्हर्नन्स दाखवा.
- हे सरकार आलं ते विश्वास घातामधून, आम्ही फार लहान आहोत, मात्र जनतेचा विश्वासघात करून हे सरकार आलं
- मोदींच्या नावाने मते मिळवता आणि त्यांनतर विरोधकांशी हातमिळवणी करतात, म्हणून हे विश्वास घाताचे सरकार आहे.
- विकासकामांना स्थगिती देण्याचं काम या सरकारने केलं. आरेबाबत सर्व माहिती मुंबई भाजपसर्व मुंबईकरांपर्यंत पोहोचवणार. आरेबाबतचे मुंबई विरोधी निर्णय या सत्य सांगणाऱ्या पुस्तिकेच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पाठवणार आणि सरकार कसे मुंबईकरांना मेट्रोपासून दूर ठवतंय हे सांगणार.
- कोणकोणते प्रकल्प सरकारे स्थगित केलेत याची यादी फडणवीसांनी वाचली.
- कोरोना काळातही महाराष्ट्र राज्य सरकार अपयशी ठरले. हे सांगतात आम्ही महाराष्ट्रात कोरोना थोपवला. देशात सवाधिक पेशंट महाराष्ट्रात आणि मृत्युदर देखील अधिक असल्याचं फडणवीसांनी बोलताना नमूद केलं. मात्र रस्त्यावर तडफडून मेलेले लोक आम्ही पाहिले. सात दिवस मृतदेह शौचालयात पडले होते. आता पुन्हा एकदा चाचण्या कमी केल्या आहेत. कोविडच्या नावाने मोठा भ्रष्टचार झाला आहे तो आम्ही समोर आणणार
- शेतकऱ्याला दिलेल्या वाचनाचे काय झाले ? सरकारने घोषणा केली मात्र मदत अजून शेतकऱ्यांना मिळाली नाही. धान शेतकऱ्यांना जशी मदत केली तशीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. जे विकेल तेच पिकेल अशी मुख्यमंत्री यांनी घोषणा केली. मात्र जे पिकलं तेच विकल नाही.
- मराठा आरक्षणासंदर्भात या सरकारने घोळ घातला आहे. तमिळनाडूचे आरक्षण यावर स्थगिती नाही मात्र मराठा आरक्षणावर स्थगती पाहायला मिळते. घटनापीठाकडे स्थगिती उठवण्याचा अधिकार नाही त्यांच्याकडेच यांनी अर्ज केला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची तरतूद असताना सरकारमधील काही मंत्री गैरसमज पसरवत आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. हे सरकार दोन समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयन्त करत आहे.
- वीजबिल संदर्भात ऐतिहासिक घुमजाव पाहायला मिळत आहे. काँग्रेसमध्ये एकमत पाहायला मिळत नाही आणि मुख्यमंत्री आपल कुटंब आपली जबाबदारी म्हणत आहे.
- राष्ट्रपती राजवट संदर्भात आमची मागणी नाही
- त्यांनी आमची तक्रार मोदींकडे केली. मात्र आमचे काम आम्ही करत राहू, त्यानी कितीही आमच्या तक्रारी पंतप्रधान यांच्याकडे करत राहू द्या
- महाविकास आघाडीत पक्षात एकमत होत नाही कारण ही अनैसर्गिक युती आहे. मला आनंद आहे कि विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमची दहशत आहे.
- या महाघाडीत सर्वात जास्त नुकसान हे जनतेचं झालं आहे. शरद पवार हे मातब्बर नेते आहेत. ते महाआघाडीत राहून आपल्या पक्ष वाढीचा फायदा घेत आहेत
- भाजपने हिंदुत्व सोडलेलं नाही. सावरकर यांच्याबद्दल वाईट लिहिणारे यांच्या मांडीला मांडी लाऊन बसतात. हिंदुत्व तुम्ही सोडलं आहे.
देवेंद्र फडणवीसांची संपूर्ण पत्रकार परिषद :
opposition leader devendra fadanavis press conference on one year of mahavikas aaghadi
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.