Devendra Fadnvis_Warli  
मुंबई

आमचं तरुणाईचं सरकार, जन्माष्ठमीचा दिवस तुम्हाला समर्पित - देवेंद्र फडणवीस

वरळीतील जांबोरी मैदानात भाजपच्या दहीहंडी उत्सवात ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे तरुणाईचं सरकार असून आजचा जन्माष्ठमीचा दिवस तुम्हाला समर्पित असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीतील जांबोरी मैदानात भाजपच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रकरणी फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर उपस्थित होते. (Our Govt is of Youth Janmashtami Day is dedicated to you says Devendra Fadnavis)

फडणवीस म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडतोय आणि श्रीकृष्णाची हंडी यासाठी फोडतोय कारण यातील विकासरुपी मलाईचा भाग सर्वांना मिळायला हवा. कालच आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, गोविंदाचा साहसी खेळांमध्ये समाविष्ठ झालाय. आता तुम्ही केवळ गोविंदा पथक नाही आहात, तर खेळाच्या टीम्स आहात. आता तुम्हाला खेळाडूंचा सर्व दर्जा मिळणार आहे. तुमची सर्व काळजी राज्य सरकार घेणार आहे. हे तुमचं तरुणाईचं सरकार आहे. त्यामुळं आजचा दिवस तुम्हाला समर्पित करतो आणि जन्माष्ठमीच्या शुभेच्छा देतो.

मुंबई महानगरपालिकेत मुंबईची सेवा करताना मुंबईचा असा विकास होऊ दे की, संपूर्ण जगात मुंबईचं नाव अग्रणी राहिलंच पाहिजे. त्यामुळं मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार दूर करायचा आहे. त्यामुळं महापालिकेतील भ्रष्टाचाराचे तुकडे करण्याची ही हंडी फोडावी, असं यावेळी आशिष शेलार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT