मुंबई - कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे; मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा, शिक्षक व पालकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. त्यासाठी पालकांच्या व्हाट्सॲप, फेसबुकचा व मोबाईल संदेशांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे झालेला बदल ही शिक्षण क्षेत्रातील नांदी असल्याचे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे.
समाजमाध्यमांचा वापर करुन शिक्षक दररोज अभ्यास देऊन त्याची तपासणी करीत आहेत. शंका, चुका दुरुस्तीसाठी प्रत्यक्ष संपर्क करुन त्या दुर केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थी अभ्यासात रमले असून शैक्षणिकदृष्ट्या त्यांचे नुकसान होत नसल्याने पालक व शिक्षणप्रेमी समाधानी आहेत. इच्छा असेल मार्ग दिसतो व शिक्षणाचा प्रवाह घरी राहूनही सतत सुरू ठेवता येतो हे या उपक्रमातून शिक्षकांनी दाखवून दिले आहे.
मोठी बातमी - आजच्या मीटिंगमध्ये मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केलीये 'ही' मागणी
संकटावर मात
शिक्षण विभागानेही शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षकांना स्मार्ट फोन असलेल्या पालकांची सूची बनविण्यास सांगितले आहे. त्यांचे व्हाट्सॲप गट बनविले जाणार आहेत. कोरोनाची ही साथ जगावर संकट म्हणून समोर आली असताना शिक्षण क्षेत्र या संकटावर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहे.
समाजमाध्यमांचा वापर करुन प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यास दिल्या आहेत. विद्यार्थी त्या नियमित सोडवून वर्ग शिक्षकांना सोडवुन दाखवत आहेत. त्यामुळे पालक अतिशय समाधानी असल्याचे दिसून येत आहे.
सर्व शिक्षकांनी जर अशाच प्रकारचे उपक्रम राबविले तर मुलांचा अभ्यास मागे राहणार नाही आणि कोरोना संसर्गही मुलांना होणार नाही. - तृप्ती सावंत,शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा बनोटी
मोठी बातमी - कोरोनाची चेन तोडण्यासाठी 'इथे' स्वतःच नागरिकांनी केला आपला परिसर सील
कोरोनामुळे सुट्टी जाहीर झाल्यापासून विद्यार्थी व्हाट्सॲप गट बनविले आहेत. या ग्रुपवरून अभ्यास दिला जात आहे. एक सकारात्मक असे पाऊल यानिमित्ताने पुढे पडत आहे. या बाबीचा भविष्यातील शिक्षण क्षेत्रावर चांगला परिणाम होईल. - मनोहर पूरी, माध्यमिक शिक्षक, माणगाव
overwhelming response to online learning education experts are expecting change in future
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.