paduka darshan sohala 2024 singer hariharan talks about spirituality meditation family guide initiative Sakal
मुंबई

Paduka Darshan Sohala 2024 : गायन हा प्रकार आध्यात्मिकच! जीवनात गुरूंचे महत्त्व काय? ए. हरिहरन यांची विशेष मुलाखत...

‘सकाळ माध्यम समूहा’च्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात प्रसिद्ध गायक ए. हरिहरन गाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

‘सकाळ माध्यम समूहा’च्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात प्रसिद्ध गायक ए. हरिहरन गाणार आहेत. या वेगळ्या कार्यक्रमात गाण्यासाठी ते एखाद्या लहान मुलासारखे उत्सुक आहेत. या कार्यक्रमातून सर्वांना आशीर्वाद आणि मनःशांती मिळावी, तसेच विचार चांगले व्हावेत, अशीच त्यांची भावना आहे. हाच विचार करून सर्वांनी पादुकापूजनाला व गायनाच्या या कार्यक्रमाला यावे, ही त्यांची भावना आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने

ए. हरिहरन यांची विशेष मुलाखत...

संकल्प ते सिद्धी सोहळ्याच्या माध्यमातून ‘सकाळ’ने सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्याचा एक मार्ग दाखवला आहे. याबाबत तुम्हाला काय वाटते?

संस्कृतीला पुढे घेऊन जाण्याचे काम तुम्ही करत आहात, ही चांगली गोष्ट आहे. हे आपले संस्कार आहेत. यामुळे मनाचा विस्तार होतो, हृदयाचा आणि जीवनाचा विस्तार होतो.

धार्मिक, आध्यात्मिक गायनाचा तुमचा अनुभव कसा आहे. मानसिक समाधान, आनंदाची प्रचिती यातून मिळते. त्याबद्दल काय सांगाल?

गाताना आम्ही सूर लावत असतो, तेव्हा ध्यानच लावत असतो. ध्यान पूर्णपणे लावले नाही, तर बेसूर होण्याची शक्यता असते. त्यामुळे गायन हा प्रकारच आध्यात्मिक आहे. मी सर्व प्रकारची भजने गायली आहेत. शिव भजन, राम भजन, हनुमान चालिसा... मी गायलेले हनुमान चालिसा तब्बल साडेतीन अब्ज श्रोत्यांनी ऐकले आहे.

याला मी हनुमानजींचाच आशीर्वाद मानतो. माझ्या लहानपणी आम्ही माटुंग्यात राहत असू. तिथे राममंदिरात भजनीमंडळी होती. त्यामुळे मी माझ्या आजीसमवेत आठवड्यातून दोन-तीन दिवस कथा ऐकण्यासाठी तिथे जात असे.

तिथे कीर्तन होत असे, कथावाचन होत असे. हे सर्व मी ऐकलेले आहे. त्यामुळे आमच्या संस्कारात भक्तिभाव भरपूर आहे, तसेच माझे आई-वडील कर्नाटक संगीतातील पंडित होते. त्यामुळे मी तेही शिकलो. ते सर्व राम आणि कृष्णाशी संबंधितच आहे. त्यात भक्तिरस आहे. त्यानंतर मी हिंदी गाणी, गझला गायल्या. त्याच्या जोडीला पॉप संगीतही होते.

जीवनात गुरूंचे महत्त्व काय असते?

ज्याला चांगला गुरू मिळतो, त्याचे चांगले जीवन घडते. कारण, मार्गदर्शन असणे गरजेचे आहे. चांगला गुरू मिळण्यासाठी आशीर्वाद पाहिजे. सर्वांना गुरू मिळत नाही. तुमचे विचार, व्यक्तित्व, तुम्ही करीत असलेले काम हे सर्व गुरूकडूनच जाणून घेऊ शकता.

हे खरे की, आपल्या आत बऱ्याच गोष्टी असतात. पण, त्यांना चालना देण्यासाठी एका गुरूची आवश्यकता असते. आता यू-ट्यूब गुरू झाला आहे! तिथूनही आपण शिकू शकतो. पण, प्रत्यक्षात गुरू असणे गरजेचे आहेच.

आध्यात्मिक आणि संगीत यांचा मिलाफ कसा होतो? तो कसा साधावा?

संगीत हे फ्रिक्वेन्सीशी संबंधित आहे. फ्रिक्वेन्सीपासून वातावरण बनते. ज्या ठिकाणी बसून आपण गात असतो, तिथे काहीतरी वेगळेच वातावरण तयार होते. हे का होते? कारण प्रत्येक सुरात रस असतो. म्हणजे बघा, की तुम्ही एखादे चांगले गीत ऐकता, तेव्हा तुमच्या डोळ्यांत अचानक पाणी येते. कशामुळे? कारण, तुमच्या मनाला ते कुठेतरी स्पर्श करते. तुमच्या आत्म्याला स्पर्श करते. दुसऱ्या बाजूला गाणे ऐकून तुम्हाला छान वाटते, तुम्ही नाचायला लागता. संगीत एवढा परिणाम साधते. त्यामुळे संगीत हे पूर्णपणे तत्त्वज्ञानात्मक आहे.

 भारतीय संस्कृती जगभरात पोहोचविण्यासाठी गीत-संगीत हे प्रभावी माध्यम आहे, याविषयी आपणास काय वाटते?

शब्दाच्या माध्यमातून एखादी गोष्ट समजायला कठीण जाते, तेव्हा भाव आणि सुरांच्या माध्यमातून ती अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. संगीत एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे. हे माध्यम सर्वोत्तम आहे.

भक्तिगीतांवरील प्रतिसादाविषयी काय सांगाल?

एकदा मी इंदूरमध्ये भजन गायन करत होतो. आमचा कार्यक्रम एक तासाचा होता. मात्र लोक इतके मग्न झाले, की मी गातच राहिलो. कारण मी भक्तिभावाने गातो आणि त्यात शास्त्रीय संगीताचेही एक अंग असते. त्यामुळे मी फक्त कोरडे भजन गात नाही, तर माझी गायकी त्यात असते. मी आजवर भक्तिगीतांचे अनेक कार्यक्रम केले आहेत, मात्र ‘सकाळ’चा हा कार्यक्रम विशेष आहे. कारण, यात गुरूंच्या पादुका आहेत, येथे अग्निहोत्र होत आहे. त्यामुळे हे अतिशय पुण्याचे काम आहे. त्यामुळे यात सहभागी होत असल्याचा मला आनंद आहे...

श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याबाबत तुमच्या भावना काय आहेत? श्री फॅमिली गाईडच्या माध्यमातून एकाच ठिकाणी १८ संत-महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. त्याबद्दल काय वाटते?

मी एखाद्या लहान मुलासारखा उत्सुक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पादुका एकत्र येणे ही खूपच चांगली गोष्ट आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’चा हा विचार खूपच सुंदर आहे. सामान्य लोकांना अशाप्रकारची संधी दुसरीकडे कुठे मिळणार आहे?

मी अभिजित पवार यांच्याशी यासंदर्भात बोललो आणि मला खूप आनंद झाला. खूपच चांगले काम करत आहेत ते. यापासून आशीर्वाद घेऊन आपल्याला मनःशांती मिळो आणि आपले विचार चांगले होवोत. हाच विचार करून आपण पादुका पूजन करायला हवे. देव असेल किंवा संत मंडळी असतील, ते आपले मार्गदर्शक आहेत.

या मार्गावर चालल्यास आपल्याला देव भेटेल. या संतांचे चैतन्य आपण अंगीकारायला हवे. सध्या माणसाच्या जीवनात संभ्रम खूप आहे. कारण, एकाच वेळी अनेक गोष्टी सुरू आहेत. आई-वडील स्वतःच संभ्रमात आहेत, तर मुलांची स्थिती काय असणार? स्थिरतेसाठी एका जागेवर मजबूत पकड असणे गरजेचे आहे. आणि धर्म, तत्वज्ञान या गोष्टीही पकड आहेत. यामुळे आपण संभ्रमात राहणार नाही. समाजात या गोष्टीचा प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT