विरार : पालघर जिल्हापरिषदेच्या 15 जागा आणि जिल्ह्यातील पंच्यायत समितीच्या 14 जागांसाठी आज सकाळ पासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली. महाविकास आघाडी राज्यावर सत्तेत आल्या नंतर जिल्हात होणारी हि पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढत नसून सर्वच पक्ष आपले नशीब अजमावण्यासाठी वेगवेगळे लढत असले तरी शिवसेनेने मात्र हि निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत खासदार पुत्र उभे असल्याने साऱ्यांचे लक्ष पालघरवर लागले आहे. या निवडणुकीत सत्तेतील साऱ्याच पक्षाचे मंत्री ठाण मांडून बसल्याने निवडणुकीत रंग भरले गेल्याचे चित्र दिसत होते. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीसाठी 60 टक्के एवढे मतदान झाले आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागा साठी आणि पंच्यायत समितीच्या 14 जागांसाठी आज सकाळ पासून मतदानाला सुरुवात झाली . महाविकास आघाडी अस्तित्वात आल्या नंतर होणारी पालघर जिल्ह्यातील हि पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत सारेच पक्ष एकमेका विरोधात उभे ठाकले असून एकमेकांची ताकद अजमावत आहेत. निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली.
सकाळी मतदानासाठी कमी गर्दी असली तरी 10 नंतर मात्र बऱ्या पैकी गर्दी दिसून येत होती. या निवडणुकीत खासदारपुत्राने चांगलेच रंग भरल्याने डहाणू तालुक्यातील वणई गट स्थानिक विरुद्ध उपरा याने चांगलाच गाजला असून , निवडणुकीत कोण जिंकणार यावर पैजा लागू लागल्या आहेत. पालघर मधील नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गटासाठी भाजप आणि सेनेत सरळ लढत होत असून याठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. या निवडणुकीत भाजप आणि मनसे जसे एकत्र आले तसेच का शेवटच्या क्षणी वाडा तालुक्यातील गारगाव मतदार संघात भाजपच्या करुणा वेखंडे यांनी शिवसेनेच्या नीलम पाटील यांना पाठिबा दिल्याने या ठिकाणचे चित्र बदलले आहे.
गेल्यावेळी विक्रमगड मधील ओलांडे गटातून विजयी झालेले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असलेल्या निलेश संभारे यांचे पद ओबीसी आरक्षणात गेल्याने यावेळी ते उभे राहिले नसले तरी या गटात राष्ट्रवादी ,भाजप आणि सेनेत जोरदार लढत अपेक्षित आहे याठिकाणी जवळपास 70 टक्के मतदान झाल्याने हि जागा राष्ठ्रवादि राखते कि सेना हे उद्या समजणार आहे. त्यामुळे उद्या सर्वपित्र अमावसेला कोणता पक्ष कोणाचे श्राद्ध घालतो ते समजणार आहे. या निवडणुकीत आम्हीच विजयी होणार असल्याचा दावा साऱ्याच पक्षांनी केला आहे.
पालघर जिल्हा परिषदेसाठी झालेले मतदान 3. 30 मिनिटा पर्यंतचे
वसई 64. 67 , पालघर 49 . 48 , वाडा 47. 29 ,मोखाडा 49. 25 , विक्रमगड 68. 09
डहाणू 50. 82 , तलासरी 60. 15
जिल्ह्याची सरासरी 49 ,48
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.