मोखाडा : पालघर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ने भारती कामडींची प्रथम ऊमेदवारी जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली होती. जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या संवेदनशील प्रश्नाला हात घालून, वातावरण तापवले होते. पालघर विधानसभा शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
तर डहाणू आणि विक्रमगड मध्ये महायुतीच्या घटक पक्षाचे मातब्बर आमदार आहेत. जिल्ह्यात भाजप चा एकही आमदार नाही. असे असताना या भागात डाॅ हेमंत सवरा यांनी मताधिक्य घेतले आहे. येथे भारती कामडींना सपाटून मार खावा लागला असल्याचे, मतांच्या आकडेवारीने समोर आले आहे. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दोन दिवसांत आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
पालघर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी च्या शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पहिल्या पासूनच आघाडी घेतली होती. पक्षातील फुटीनंतर ही जिल्ह्यात ऊध्दव ठाकरे यांनी आपली पकड निर्माण केली होती. जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या संवेदनशील प्रश्नाला हात घालून, त्यांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवले होते. यावेळी वाढवण बंदर विरोधी संघर्ष कृती समिती ने महाविकास आघाडी ला मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यातच वसई, विरार, नालासोपारा या भागात ऊध्दव ठाकरे यांना मोठी सहानुभूती देखील मिळाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडी च्या घटक पक्षातील डहाणू चे आमदार विनोद निकोळे यांनी ऊध्दव ठाकरेंच्या सभेत मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातुन भारती कामडींना मोठे मताधिक्य मिळणार अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या डहाणू विधानसभा क्षेत्रात भारती कामडींना केवळ 882 मतांची आघाडी मिळाली आहे.
विक्रमगड विधानसभा क्षेत्रात मित्र पक्षाचे आमदार सुनिल भुसारा आहेत. तसेच भारती कामडी देखील याच मतदार संघातील आहेत. याच मतदार संघातुन विधानसभेला डाॅ हेमंत सवरा यांचा सुनिल भुसारांनी मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला होता. त्यामुळे या मतदार संघातुन कामडी मोठे मताधिक्य घेतील अशी अपेक्षा आघाडी सह सर्वानाच होती. मात्र, विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढत सुमारे 33 हजार 209 मतांची आघाडी घेतली आहे. तर बहुजन विकास आघाडी चे कुठलेही वर्चस्व नसताना, त्यांचे ऊमेदवार राजेश पाटील यांना 22 हजार 70 मते मिळाली आहेत. त्यामुळे डहाणू आणि विक्रमगड विधानसभा क्षेत्रात आघाडीत बिघाडी झाल्याचे मतदानाच्या आकडेवारी वरून समोर आले आहे. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात संविधान बदल, आरक्षण हे मुद्दे खोडून महायुतीने, महाविकास आघाडी ला धोबीपछाड दिली आहे.
तर पक्ष फुटीनंतर ही पालघर विधानसभा क्षेत्रात ऊध्दव ठाकरेंचा प्रभाव असल्याचे, त्यांच्या झालेल्या सभांनी दाखवुन दिले आहे. येथुन त्यांच्या नेतृत्वाखाली आमदार निवडून गेलेला आहे. तसेच वाढवण बंदराला विरोध करून, ठाकरेंनी येथील ज्वलंत प्रश्नाच्या वर्मावर बोट ठेवले होते. मात्र, येथे ही महायुतीचे ऊमेदवार डाॅ हेमंत सवरांनी सुमारे 29 हजार 239 मतांची आघाडी घेत सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे येथे वाढवण बंदराच्या मुद्द्याचा कुठलाही, अडसर महायुतीला झाल्याचे, मतांच्या आकडेवारी वरून दिसुन आले आहे. त्यामुळे महायुतीचे वर्चस्व असलेल्या या तिन्ही विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
विधानसभा क्षेत्र निहाय मतांची आकडेवारी...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.