plaghar loksabha mahayuti first meeting sakal
मुंबई

Palghar Loksabha Election : पालघर लोकसभेची पहिली प्रचार सभा जव्हारला; महायुतीचे अनेक नेते उपस्थित

महायुतीचा प्रचाराचा पहिला नारळ हा विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील जव्हार येथे फोडण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

जव्हार - जव्हार पालघर लोकसभा ही मुंबई लगत असल्याने, ही जागा भाजप ने लढवावी असा हट्ट भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याने तशी परिस्थिती निर्माण होऊन, अनेक तर्क वितर्क फोल ठरत ही उमेदवारी शिंदे गटाकडून निसटून भाजपच्या पदरी पडली.

दरम्यान, महायुतीचा प्रचाराचा पहिला नारळ हा विक्रमगड विधानसभा क्षेत्रातील जव्हार येथे फोडण्यात आला. सोमवारी सकाळी ११ वाजता या सभेचे आयोजन हे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी मोकळ्या मैदानात करण्यात आले होते.यावेळी पालमंत्री रविंद्र चव्हाण, यांच्या मुख्य उपस्थितीत सभा संपन्न झाली.

यावेळी खासदार राजेंद्र गावित, जि. प. अध्यक्ष प्रकाश निकम, राष्ट्रवादीचे अंनद ठाकूर, उमेदवार डॉ. हेमंत सावरा, भरत राजपूत, संतोष जनाठे, भाजपचे, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष निकम यांनी आपल्या भाषणात हेमंत सावरा यांच्या प्रचार मेळाव्यात बोलताना सांगितले की, संविधान बदलणार असे विरोधी पक्षनेते सांगत आहे, मी तुम्हाला ग्वाही देतो हे मोदी सरकारात कधीच होणार नाही, घटना बदलण एवढं सोप नाही.

'जब तक सूरज चांद रहेंगा घटना कोई नहीं बदलेंगा' असे उदगार यावेळी निकम यांनी काढत उपस्थितांना दिलासा दिला, तर सवरा तुम्ही विक्रमगड विधानसभा क्षेत्रात येवू नका आम्ही तुम्हाला याभागातून निवडून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली, दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदिवासी राष्ट्रपती पद देऊन समाजाला मोठा मान दिल्याने हे सरकार आदिवासींच्या पाठीशी असल्याचे ठासून सांगितले .

विद्यमान परंतु नाराज उमेदवार खासदार राजेंद्र गावित यांनी सवरा यांना वडिलांच्या पुण्याईमुळे सीट मिळाली असून, महायुतीचा घटक म्हणून मी व माझे पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येवून काम करणार असल्याची ग्वाही दिली, तर आपली स्पर्धा ऊबाठा सोबत नसून बहुजन विकास आघाडी सोबत आहे, असे त्यांनी सांगितले.

बहुजन विकास आघाडीसाठी वसई विरार महानगरपालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, त्यांचे सर्व लक्ष वसई, नालासोपारा, बोईसर याभागात असून, त्यांना ग्रामीण भागाची काहीही पडलेली नाही त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणून द्यावं लागेल असे त्यांनी बोलतांना सांगितले.

उमेदवार सवरा यांनी आरोग्य सेवा बळकटीकरण करण्याची ग्वाही दिली व ही निवडणूक गल्लीतील नाही तर देशाची आहे, त्यामुळे मला निवडून द्या मी जास्तीत जास्त विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीन असे स्पष्ट केले.

दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हान यांनी बोलताना सांगितले की, देश सुरक्षित कसा राहील, जात, पात , धर्म न पाहता सामान्य माणसांना न्यान मिळवून देण्यासाठी मोदींनी काम केलं आहे. कोरोना काळात सगळी व्यवस्था ठप्प असताना गरीब कुटुंबांना धान्य दिलं, देश अखंड राहिला पाहिजे असे आश्वासन दिले, तर पंतप्रधान पदाला दुसरा चांगला पर्याय नाही म्हणून मोदींना निवडून द्या असे बोलतांना सांगितले. आम्ही याभागात आश्रमशाळा फाईव स्टार केल्यात, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात टॅब देऊन डिजिटल शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे असे बोलून त्यांनी सवरा यांना निवडून द्या अशी विनंती केली.

या वेळी महायुतीचे घटक पक्ष, कार्यकर्ते असे जवळपास ५ हजार नागरिक उपस्थित होते, व हेमंत सवरांना खासदार करून या भागातील समस्या सोडवण्यासाठी दिल्लीतील नव्या संसद भवनात पाठवल्या शिवाय राहणार नाही अशी शपथ घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT