Palghar Loksabha sakal
मुंबई

Palghar Loksabha: मोखाड्यात खासदार डाॅ हेमंत सवरांच्या अभिनंदनाचा बॅनर फाडला!

सकाळ वृत्तसेवा

Mokhada Latest News : मोखाडा शहरात भारतीय जनता पार्टी चे नवनिर्वाचित खासदार हेमंत सवरा यांचा अभिनंदनाचा व मतदारांचे आभार मानणारा बॅनर लावण्यात आला होता. त्या बॅनरवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि खासदार डाॅ हेमंत सवरा यांचे फोटो अज्ञाताने ब्लेड ने फाडल्याची घटना घडली आहे.

त्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवत मोर्चा काढुन, घृणास्पद कृत्य करणार्या समाज कंटकाला अटक करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत चे निवेदन मोखाडा पोलीस ठाण्यात दिले आहे.

लोकसभा निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघातुन भाजप चे डाॅ हेमंत सवरा हे प्रचंड मताधिक्याने निवडुन आले आहेत. त्यांचे अभिनंदन व मतदारांच्या आभाराचा बॅनर ( फलक ) मोखाडा बाजारपेठेत भाजप पदाधिकार्यांनी लावला होता. या बॅनर वर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व नवनिर्वाचित खासदार हेमंत सवरा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा फोटो आहेत.

शनिवारी रात्री अज्ञात समाजकंटकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि खासदार डाॅ हेमंत सवरा यांच्याच फोटोला ब्लेड ने फाडले आहेत. सदरची घटना कळताच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते संतप्त झाले. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शेकडो कार्यकर्ते शहरात जमा झाले.

या घटने विरोधात मोखाडा तालुका भाजप अध्यक्ष संतोष चोथे, जेष्ठ नेते हरिश्च॔द्र भोये यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. या निषेध मोर्चात विठ्ठल चोथे, मिलिंद झोले, जयराम निसाळ, नरेंद्र पाटील या प्रमुख पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा निषेध मोर्चा मोखाडा बस स्थानका पासुन थेट पोलीस स्टेशनवर जाऊन धडकला.

आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे आश्वासन मोर्चेकर्यांना दिले आहे. अज्ञाता विरोधात मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तात्काळ अटक केली नाही तर यापेक्षा मोठे जण आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप मोखाडा तालुकाध्यक्ष संतोष चोथे यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT