Palghar Loksabha sakal
मुंबई

Palghar Loksabha: अर्ज दाखल करण्याची तारीख येऊनही महायुतीचा ऊमेदवार ठरेना; कार्यकर्ते संभ्रमात  

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

Palghar News: पालघर लोकसभेच्या जागेसाठी  20  मे ला मतदान होणार आहे. त्यासाठी ऊमेदवारी अर्ज दाखल करण्याची शुक्रवार  26  एप्रिल ते  3  मे पर्यंत प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सर्वात प्रथम भारती कामडी यांची ऊमेदवारी जाहीर करून प्रचार सुरु केला आहे.(palghar loksabha election)

जिल्ह्यात प्रबळ ताकद असलेल्या बहुजन विकास आघाडी ने निवडणुक लढण्याचा निर्णय घेऊन बोईसर चे आमदार राजेश पाटील यांची ऊमेदवारी निश्चित करून त्यांना लोकसभेच्या रिंगणात ऊतरवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सत्तेत असलेल्या महायुतीने ही जागा कोणत्या पक्षाला असुन ऊमेदवार कोण असणार आहे हे अजुनही निश्चित केलेले नाही. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. (Palghar News)

  पालघर लोकसभेची निवडणुक, महायुतीत अजुनही ऊमेदवार निश्चित करण्यात अडकली आहे. शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी यांना ऊमेदवारी देऊन, त्यांच्यासाठी ऊध्दव ठाकरे यांनी एक प्रचार सभा जिल्ह्यात घेतली आहे. त्यामुळे भारती कामडी यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. कामडी आणि ऊबाठा गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदार संघात प्रचाराची राळ ऊडवली आहे. 

             जिल्ह्यात तीन आमदार, जिल्हा परिषदेत बहुसंख्य सदस्य तसेच वसई- विरार महापालिकेत एकहाती सत्ता आणि एकछत्री अंमल असलेल्या आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडी ने लोकसभा निवडणुक लढण्याचा निर्णय घेऊन महायुती आणि महाविकास आघाडी ला मोठा धक्का दिला आहे.

यापूर्वी मतदार संघाच्या पर्नरचनेनंतर बहुजन विकास आघाडी ने बळीराम जाधव यांना खासदार म्हणून निवडून आणले होते. आता पुन्हा बहुजन विकास आघाडी ने बोईसर चे आमदार राजेश पाटील यांना ऊमेदवारी देऊन पालघर लोकसभेसाठी रिंगणात ऊतरवले आहे. तसेच ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे. 

  दरम्यान, केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीने अजुनही ही जागा शिवसेना किंवा भाजप च्या वाट्याला आलेली आहे हे जाहीर केलेले नाही. तसेच ऊमेदवार ही निश्चित केलेला नाही. विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांनी शिवसेनेकडून आपल्यालाच ऊमेदवारी निश्चित असल्याचे सांगत प्रचाराला सुरूवात केली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी भाजप चे पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी राजेंद्र गावीत यांच्या ऊमेदवारी ला माध्यमांकडे ऊघड विरोध केला आहे.

तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षांनी राजेंद्र गावीतांच्या ऊमेदवारी ला कडाडून विरोध करत राजीनामा देण्याचा ईशारा दिला होता. या संघर्षावर पडदा टाकण्यासाठी भाजप चे महाराष्ट्र लोकसभा निवडणुक प्रभारी डाॅ दिनेश शर्मा आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना मनोर येथे पत्रकार परिषद घ्यावी लागली होती. यावेळी शर्मा यांनी ऊमेदवार कोणीही असो, नरेंद्र मोदी हेच ऊमेदवार समजून महायुती च्या पदाधिकार्यांनी कामाला लागण्याचा आदेश वजा सज्जड ईशारा दिला आहे. 

शर्मांच्या ईशार्याने भाजप पदाधिकार्यांच्या बंडाच्या तलवारी म्यान झाल्या.....

मनोर येथे डाॅ दिनेश शर्मा यांनी नरेंद्र मोदी हेच ऊमेदवार समजून कामाला लागण्याचे आदेश महायुती च्या पदाधिकार्यांना दिले. मात्र, अजुनही ही जागा भाजप किंवा शिवसेना लढणार तसेच ऊमेदवार कोण असणार हे जाहीर केलेले नाही.

मात्र, शर्मांच्या सज्जड ईशार्यानंतर भाजप च्या एकाही पदाधिकार्यांने राजेंद्र गावीत यांच्या विरोधात ऊघड प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे पुर्वी महिनाभर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही जागा भाजप ला मिळावी तसेच निष्ठावान ऊमेदवार देण्याची भाजप मागणी केली होती तसेच बंडाचा झेंडा ऊभारला होता. ते बंड आता म्यान झाल्याचे दिसत आहे. 

महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात....

शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भारती कामडी यांची ऊमेदवारी जाहीर करून प्रचाराचा धुराळा ऊडवला आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडी ने आमदार राजेश पाटील यांची ऊमेदवारी निश्चित केली आहे.

ऊमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी  26  एप्रिल पासुन सुरुवात झाली आहे. मात्र, महायुतीचा जागा आणि ऊमेदवारी चा तिढा सुटलेला नाही. प्रचारासाठी कमी कालावधी मिळणार आहे. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील कार्यकर्ते संभ्रमात पडले असुन " त्यांची तोंड दाबुन भुक्क्यांचा मारा " अशी अवस्था झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT