sakal
मुंबई

Palghar Loksabha: पालघरमध्ये चौरंगी लढतीची शक्यता? महायुतीचा तिढा सुटेना, बहुजन विकास आघाडीचा ऊमेदवार गुलदस्त्यात!

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा

Palghar News: लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन महिण्याचा कालावधी होत आला आहे. महाविकास आघाडी ने आपला ऊमेदवार जाहीर केला आहे. त्यापाठोपाठ जिजाऊ संघटनेने पहिल्यांदाच या निवडणुकीत ऊडी घेत, आपला ऊमेदवार जाहीर केला आहे. बहुजन विकास आघाडीने ही निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र आपला ऊमेदवार घोषीत केलेला नाही. तर सत्ताधारी तीन पक्षाच्या महायुतीत येथील जागा कोण लढवणार तसेच ऊमेदवार कोण असणार हे अजुनही ठरलेले नाही. मात्र, महायुती निवडणुका लढण्यास सज्ज असल्याने, यावेळी पालघर ची निवडणुकीत चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र ऊभे राहीले आहे.

पालघर लोकसभेसाठी शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कामडी यांना ऊमेदवारी देऊन, महाविकास आघाडी ला धक्का दिला आहे. ऊमेदवारी जाहीर होताच भारती कामडी आणि शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. त्यामुळे पालघर मध्ये शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रचारात आघाडी असल्याचे दिसून येत आहे.

महाविकास आघाडीत येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावीत आहेत. मात्र, यावेळी या जागेवर भाजप ने दावा केला आहे. शिवसेना आणि भाजप च्या परस्पर विरोधी दाव्याने, या जागेचा आणि ऊमेदवारी चा तिढा कायम आहे. मात्र, आपणांस वरिष्ठांनी आदेश दिल्याचे सांगत, राजेंद्र गावीतांनी एकतर्फी प्रचार सुरु केला आहे. परंतु कोणत्या पक्षाकडुन ऊमेदवारी आणि चिन्ह काय असणार आहे ? ह्याचा तिढा सुटलेला नाही. गावीतांच्या ऊमेदवारी ला भाजप जिल्हाध्यक्षांसह पदाधिकार्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे येथुन महायुती कडून कोण ऊमेदवार असणार आहे, याचे कोडे कायम आहे.

पालघर लोकसभेची पहिली निवडणूक जिंकलेल्या आणि जिल्ह्यात तीन विधानसभेवर आपले वर्चस्व असलेल्या बहुजन विकास आघाडी ने स्वतंत्र निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार हितेंद्र ठाकुर यांनी जाहीर केले आहे. मात्र, आपला ऊमेदवार गुलदस्त्यातच ठेवला आहे. त्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

महायुतीचा तिढा कायम असतांना, पालघर सह कोकण विभागात अल्पावधीत, गाव पाड्यांमध्ये पोहोचलेल्या निलेश सांबरेंच्या जिजाऊ सामाजिक संघटनेने या निवडणुकीत पालघर आणि भिवंडी ची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीत स्वतः निलेश सांबरे तर पालघर मध्ये कल्पेश भावर यांची ऊमेदवारी जाहीर करून, सांबरेंनी प्रस्थापित पक्षांपुढे आव्हान ऊभे केले आहे. त्यांनी जिल्ह्यातील समस्या तसेच जटील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मतदारांना दिले आहे.

एकूणच, सध्यस्धितीत शिवसेना ऊध्दव बाळासाहेब ठाकरे, महायुती, बहुजन विकास आघाडी आणि जिजाऊ सामाजिक संघटना यांचे चार प्रमुख ऊमेदवार या निवडणुकीत ऊभे ठाकणार असल्याने, यावेळची निवडणुक चौरंगी लढती ची, अटीतटीची आणि रंगतदार होणार असल्याचे चित्र ऊभे राहीले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT